heart attack 
health-fitness-wellness

Heart Attack : ३ वर्ष आधीच समजेल हृदयविकाराचा धोका, वैज्ञानिकांचा दावा

लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे डॉ रामजी खमीज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे

सकाळ डिजिटल टीम

हृदय रोगाच्या समस्या आता ज्येष्ठांप्रमाणे तरूणांनाही भेडसावू लागल्या आहेत. हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याची वाढती प्रकरणे बघता हे दिसून येत आहे. पण, तुम्हाला हृदयविकाराचा धोका आधीच कळला तर? शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन संशोधनात (Study) हृदयविकाराचा धोका 3 वर्षे आधीच कळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे होणारे मृत्यूही टाळता येणार आहेत.

वैज्ञानिकांनी लावलेल्या या शोधामुळे योग्य लक्ष दिल्यास तसेच दाहक-विरोधी औषधांद्वारे लाखो जीव वाचवले जाऊ शकतात. पण, शास्त्रज्ञांनी या आधी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांच्या सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीनची तपासणी केली. हे प्रथिन रोग वाढण्याच्या जोखमीविषयी माहिती देते. त्यांनी ट्रोपोनिन नावाच्या प्रथिनाची प्रमाणित चाचणी केली. हृदयाला इजा होत असताना हे प्रथिन रक्तातून बाहेर पडते.

heart attack

अहवालानुसार, ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सिस्टीमच्या सुमारे 2.5 लाख रुग्णांची CRP पातळी वाढली होती. त्यांची ट्रोपोनिन चाचणी पॉझिटिव्ह आली. तीन वर्षांत त्यांच्या मृत्यूची शक्यता सुमारे ३५ टक्के होती. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे डॉ रामजी खमीज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लीपर, यांनी या अभ्यासाला निधी दिला आहे. ते म्हणाले, 'डॉक्टरांच्या वैद्यकीय किटसाठी हे एक उपयुक्त साधन आहे. तसेच, एका अभ्यासात जर एखादी व्यक्ती दिवसातून सुमारे चार तास अॅक्टिव्ह राहिली तर हृदयविकाराचा धोका ४३ टक्क्यांनी कमी होतो, असेही दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT