नागपूर : पोस्ट कोविड काळात म्युकरमायकोसिसने (mucormicosys) नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांनाही या बुरशीची (black fungus) लागण होवू शकते. उष्णता (heat), पित्त, अॅसिडिटीचा (acidity) त्रास असणाऱ्यांनीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉ. पंकज जोगी यांनी सांगितले. (heat and acidity patients may infected with black fungus says expert)
तुम्ही काय खाता हे महत्त्वाचे नसून पचवता किती याकडे लक्ष हवे. कारण पोटातून अनेक रोगांचा उगम होतो. आपला दिनक्रम सुनियोजित असेल व स्वच्छतेसह चांगला आहार आधीपासून घेत असाल तर आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता चांगली राहते. इम्युनिटी एका दिवसात येत नाही. म्युकरमायकोसिस आपल्या कमजोर झालेल्या प्रतिकारशक्तीला आणखी दुबळे करते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले व दमट वातावरण मिळाले तर ही बुरशी घातक ठरते. मात्र, यावर उपचार करणे शक्य असून त्वरित निदान होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
प्रायमरी स्टेज अशी ओळखा
रक्तातील शुगर लेव्हल अनकंट्रोल राहत असेल
डोळे व त्याबाजुचा भाग लालसर होतो
तोंडात नेहमी अल्सर, काही ठिकाणी काळे चट्टे
डोळ्यातून पाणी येणे, नाकातून काळा स्त्राव
अधूनमधून तापाचा फणकारा, अंग गरम राहणे
हे करा
आंबट, जास्त मिठयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवा
योगसने करा, नियमित व्यायामाची सवय लावा
कोणतीही शंका असेल तर त्वरित उपचार घ्यावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.