home isolation
home isolation  e sakal
health-fitness-wellness

होम आयसोलेशनमध्ये आहात? मग फॉलो करा 'या' गोष्टी

शर्वरी जोशी

गेल्या दीड वर्षामध्ये कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. यामध्येच रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अनेक रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन सिलेंडर यांची कमतरता भासत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणूनच, कोविडची सौम्य लक्षणे किंवा कमी प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे आता असंख्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे रुग्णावर घरी राहून उपचार सुरु असले तरीदेखील आरोग्य यंत्रणा वारंवार या रुग्णांची चौकशी करत आहेत. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक रुग्ण बरे होतांना दिसत आहेत. मात्र, औषधांसोबतच रुग्णाने व त्यांच्या कुटुंबियांनी या काळात दैनंदिन जीवनशैलीत काही मुलभूत बदल करणं गरजेचं आहे. म्हणूनच पुण्यातील M.D.D.P.C डॉ. मर्दा घनश्याम (drgmarda@gmail.com) यांनी काही आयुर्वेदिक उपचार व दिनक्रम सांगितला आहे. (home isolation and care for covid 19)

फॉलो करा 'या' गोष्टी

१. गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या करणे. शेवटची गुळणे गिळणे

२. गुळण्या करतांना त्यात लवंग तेलाचे थेंबही टाकू शकता.

३. कोणत्याही कापूरयुक्त तेलामध्ये मीठ घालून त्या तेलाने छाती आणि पाठीला मालिश करावी.त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करावी.

४. दोन्ही नाकपुड्यामध्ये तेल किंवा तूपाचे २ थेंब टाकावेत. दिवसातून ३ वेळा हा प्रयोग करावा.

५. कापूर/ निलगिरी/ दालचिनी/ वेलची यांचा ठराविक अंतराने वास घेत राहणे.

६. घरात धूप, कापूर ओवा यांची धुरी करणे.

आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांनी सकाळी तुळशी रस २ चमचे+ १ चमचा मध + मीर पूड१/८चमचा एकत्र करुन त्याचं सेवन करावं. किंवा, आल्याचा रस १ चमचा+मध१/२चमचा एकत्र करुन ते चाटण घ्यावं.

२. सुंठ, दालचिनी, धणे, वेलची आणि लवंग एकत्र करुन त्याचा काढा प्यावा. किंवा हळदीचं दूध प्यावं.

३. दुपारचं जेवण १० -११ च्या सुमारास घ्यावं. यात मूग, कुळीथ, जवस, धणे, सुंठ आणि शुष्क मुळा घालून तयार केलेलं वरण आणि भात किंवा पातळ खिचडी खावी.

४. मांसाहार चालत असेल तर चिकन सूप किंवा मटण सूप प्यावं.

५. शाकाहारी लोकांनी भाज्या शिजवून त्यात आलं, लसूण, जिरे, मिरे घालून मिक्सरमध्ये फिरवून पातळ सूप करुन प्यावं.

६. दुपारी २ -३ च्या सुमारास १ कप गरम दुधात २ चमचे तूप, २ चमचे मध, लेंडी पिपली/काळे मिरे १/४ चमचा घालून प्यावे. किंवा, सुंठ, दालचिनी, धणे, वेलची आणि लवंग एकत्र करुन त्याचा काढा प्यावा.

७. जूस/सरबत/इलेकट्रॉल पावडर गरम पाण्यात घालून पिणे. ताक मसाला घालून पिणे.

८. संध्याकाळी - मूग, आले , लसूण , धणे , मिरे घालून तयार केलेलं वरण खावं

९. दिवसभर गरम पाणी पिणे.

१०. रात्री झोपण्यापूर्वी छातीला सुंठलेप लावावा. हा लेप वाळल्यावर गरम पाण्याने तो पुसून घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT