नागपूर : तोंडाचं आरोग्य (oral health) राखण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करणे गरजेचे आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि हेल्दी अन्न खाणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तोंड सारखे कोरडे (dry of mouth) पडते. तसेच फक्त पाणी प्यायची इच्छा होते. मात्र, यावर आपण घरगुती उपाय (home remedies to cure dry mouth) करून मात करू शकतो. (home remedies to cure from dryness of mouth)
तोंड कोरडे का पडते?
आपल्या तोंडात लाळ तयार होणे थांबते त्यावेळी तोंड कोरडे पडते. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी येणे, चव कमी होणे, चिकटपणा यांसारख्या समस्या जाणवतात. तसेच वारंवार तहान लागते.
तोंडाचा कोरडेपणा घालविण्यासाठी घरगुती उपाय?
तोंडाच्या कोरडेपणापासून सुटका हवी असेल तर तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. मात्र, हे उपाय करून देखील समस्या सुटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोरफड -
कोरफडचा रस आपले तोंड ओलसर ठेवण्यास मदत करू शकतात. त्यासाठी दररोज सकाळी एक चतुर्थांश कप कोरफडचा रस प्या. तसेच यामुळे तोंडातील दुर्गंधीपासून देखील सुटका मिळते. हा रस अल्सरवर देखील लाभदायक ठरतो.
बडीशेप
दररोज बडीशेपचे सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. तसेच यामुळे तोंडात लाळ तयार होण्यास देखील मदत होते. अर्धा चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास चांगला फायदा होते.
लिंबाचा रस
लिंबाचा रस लाळ निर्मितीस मदत करू शकतो, ज्यामुळे तोंड ओलसर राहते. त्याचे अम्लीय आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म दुर्गंधी दूर करण्यास मदत करते. एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि दिवसातून दोनदा प्या. लिंबाच्या तुकड्यांमध्ये काळे मीठ घालून दिवसातून तीन वेळा चोखल्यास तोंडात लाळ तयार होईल.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.