health-fitness-wellness

Diabetes : योग्य पध्दतीने Blood Sugar Level कशी आणि केव्हा तपासावी?

शरयू काकडे

रक्तातील साखरेची पातळी मोजण्याची योग्य पध्दत काय?( correct method of measuring blood sugar)

आपल्यापैकी बहुतेकांना आपली मन आणि प्रकृती चांगली आहे याची खात्री करण्यासाठी आपल्या रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासण्याची इच्छा असते. मधुमेह असलेल्यांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरून कोणतेही सूक्ष्म बदल लक्षात घेतले जाऊ शकतात. रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमित निरीक्षणीमुळे भविष्यातील कोणतीही गुंतागुंत टाळता येते आणि स्थिती नियंत्रणात ठेवता येते. तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची चाचणी योग्य पध्दतीने कशी करू शकता आणि ते करण्याची सर्वोत्तम वेळ काय जाणून घ्या...

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कशी तपासायची? (How to check your blood sugar level)

फिंगरटिप मीटर: तुमच्या बोटांच्या टोकांवरून रक्त वापरून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यास फिंगटीप मीटर फायदेशीर ठरते. अंगठ्याला किंवा बोटाला टोचण्यासाठी एक छोटी, धारदार सुई वापरली जाते आणि तिला ‘लॅन्सेट’ म्हणतात. लॅन्सेटमधील रक्त नंतर पातळ पट्टीमध्ये हस्तांतरित केले जाते. ही चाचणी पट्टी एका चाचणी मीटरमध्ये घातली पाहिजे जी पंधरा सेकंदांपेक्षा कमी वेळात रिझल्ट दाखवते. काहीवेळा परिणाम वीस सेकंदांनंतरही दिसू शकत नाहीत, याचा अर्थ चाचणी योग्यरित्या पार पाडली नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करा आणि योग्य नोंद घ्या. ठराविक कालावधीत तुमची सरासरी रक्तातील साखरेची पातळी सांगणारे आणि तुमच्या आधीच्या चाचणी रिझल्टचे तक्ते आणि आलेख दाखवणारे मीटर देखील आजकाल बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या स्थानिक फार्मसीमध्ये ब्लड शुगर मीटर आणि स्ट्रिप्स तुम्हाला मिळू शकते

रक्तातील साखरेची पातळी तपासण्याचे मार्ग, ( ways to test for blood sugar level)

कन्टीन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम: यालाच इंटरस्टिशियल ग्लुकोज मापन यंत्रे देखील म्हणतात. ही उपकरणे इन्सुलिन पंपसह एकत्रित केली जातात आणि कालांतराने तुमच्या रिझल्टमध्येआलेले ट्रेंड आणि पॅटर्न दर्शवू शकतात.

शरीराच्या इतर भागांची चाचणी करणारे मीटर: पर्याय म्हणून शरीराच्या इतर भागांमधून तुमच्या रक्तातील साखर तपासता येऊ शकता जसे की, अंगठ्याचा खालचा भाग, दंड, मनगटापासून कोपऱ्यापर्यंतचा हातआणि मांडी. शरीरात रक्तातील साखरेची चाचणी करता येऊ शकणार्‍या अनेक भाग असूनही, बोट हे अचूक रिझल्ट देणारे एक ठिकाण आहे कारण ते अगदी थोडे बदल शोधू शकते, विशेषत: जे जेवण किंवा व्यायामानंतर लगेच होणरे बदल. हायपोग्लायसेमिक लोकांनी रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी बोटांच्या टोकांचा वापर करावा.

तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कधी तपासावी? (When should you check your blood sugar level)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी, दिवसातून अनेक वेळा त्यांची साखरेची पातळी तपासणे अत्यावश्यक आहे. तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी होऊ शकते असे कधीही तुम्हाला वाटत असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. जेवण करण्यापूर्वी, व्यायाम करण्यापूर्वी, ड्रायव्हिंग करण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी साखरेची पातळी तपासण्याचा सल्ला दिला जातो. त्याबद्दल तज्ज्ञांचे मत घेणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी किती वेळा आणि केव्हा तपासाण्यापूर्वी इतर कोणत्याही गोष्टी विचारात घेतल्या जातील याची माहिती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT