Pregnant-women 
health-fitness-wellness

गर्भावस्थेत कोरोनापासून बचाव कसा कराल?

डॉ. माधवी कुलकर्णी (वैद्य)

सध्या कोरोनाच्या काळात व एरवीही ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण काही संशोधनानुसार गर्भालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात स्त्री आणि गर्भ दोन्हीही नाजूक अवस्थेत असतात. गर्भ अजून स्थिर व्हायचा असतो त्यामुळे या आणि पुढच्या ही काळामध्ये गर्भिणीने दुचाकीवरून, खडबडीत रस्त्यावरून प्रवास टाळलाच पाहिजे. भरभर चालणे, पोटावर जास्त ताण येईल असे व्यायाम, जडवस्तूंचे ओझे उचलणे या गोष्टी टाळल्याचं पाहिजेत. त्याचप्रमाणे भीतीदायक गोष्टी, सिनेमे पाहणे, वादविवाद, जोरात बोलणे, उताणे झोपणे टाळावे. चालण्यासारखा हलका व्यायाम करावा. चांगले संगीत ऐकावे. चांगली पुस्तके वाचावीत व चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहावे. मन आनंदी व प्रसन्न ठेवावे. 

आहारामध्ये शिळे अन्न, अति तिखट-मसालेदार पदार्थ, उघड्यावरचे अन्न , जंकफूड, बेकरीतील पदार्थ टाळावेत. घराचा शुद्ध, सात्विक आहार घ्यावा. ताज्या पालेभाजा, उसळी, पपई, व अननस सोडून इतर सर्व फळे, काळ्या मनुका, सुके अंजीर, बदाम, साळीच्या लाह्या, जर्दाळू, चारोळ्या, खडीसाखर असे पदार्थ खाण्यामध्ये ठेवावे. ताजे ताक, लोणी, दूध, तूप, लाडू, खीर याचा समावेश आहारात करावा..

गर्भ आपल्या इच्छा आईमार्फत व्यक्त करत असतो, ते म्हणजे डोहाळे अशी भारतीयांची पारंपरिक समजूत आहे.  त्यामुळे गर्भिणीला जे खावेसे वाटेल अर्थात हितकर असेल ते तिला खायला द्यावे. 

अशा प्रकारे आहार विहाराचे नियम पळाले तरी कधीकधी गर्भिणीला त्रास होऊ शकतात त्या विषयी पुढच्या भागात.... 
- डॉ. माधवी कुलकर्णी (वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

SCROLL FOR NEXT