how to reduce pigmentation from the skin know remedies Tips for reduce pigmentation from the skin
health-fitness-wellness

चेहऱ्यावरील वांग कायमचे घालवण्यासाठी हे उपाय करा .. जाणून घ्या महत्वाची माहिती

अथर्व महांकाळ

नागपूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण ता चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत. (How to reduce pigmentation from the skin know remedies)

वांग म्हणजे काय ?

ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते. आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. 

हे आहेत घरघुती उपाय (Home Remedies to reduce pigmentation)

लिंबू - 

वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्चाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा. 

बटाटा -

एक कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा.  ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करा. 

कोरफड -

चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. 

दही - 

एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागी लावा. 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. जोपर्यंत ते सुकत नाही. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. 

केळ - 

केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. 

हे उपाय करा आणि आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार बनवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT