ओमिक्रॉन
ओमिक्रॉन  esakal
health-fitness-wellness

ओमिक्रॉन-डेल्टा मध्ये फरक काय? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नवीन कोविड १९ (covid 19) च्या ऑम्रिकोन (Omicron) प्रकाराने जगभरात हाहाकार माजवायला सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने अनेक देशांनी त्यांची कोविड मार्गदर्शक तत्वांच्या गाईडलाईन्स अपडेट केल्या आहेत. अनेकांनी लॉकडाऊन लादला असून प्रत्येकाला प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

भारताने याआधी दोन्ही लाटेत कोरोनाच्या प्राणघातक परिणामांशी लढा दिला आहे. त्यातून ते बचावले आहेत. मात्र तज्ज्ञांनी नवीन कोवीड प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण त्याचे संक्रमण अत्यंत तीव्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोघांनाही 'चिंतेचे प्रकार' म्हणून घोषित केले आहे. पण यापैकी कोणता अधिक गंभीर आणि धोकादायक ते पाहणे गरजेचे आहे.

omicron

ओमिक्रॉनमुळे आणखी एक लाट येऊ शकते का?

कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला. अनेकांचे मृत्यू झाले. तर काहीजण अजूनही संसर्गाचे दुष्परिणाम सहन करत आहेत. दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हॅरियंट (varient) जबाबदार असल्याचे म्हटले जाते. तो अजूनही असून अनेकांना संक्रमित करत आहे. हा व्हरियंट पहिल्यांदा भारतामध्ये सापडला, त्यानंतर इतर देशांमध्ये केसेस आढळून आल्या. मात्र आता ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारामुळे कोरोना रूग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. ज्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिकडील निष्कर्षानुसार पुढील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते त्याचे परिणाम सौम्य असतील.

ओमिक्रॉन Corona variant

त्यांची तुलना कशी होऊ शकते ?

नवीन B.1.1.529 व्हॅरियंट(varient) किती गंभीर आहे ते आता सांगणे कठीण आहे. पण शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी (Doctor) त्याचे संक्रमण जास्त प्रमाणात होऊ शकते, असे सुचविले आहे. कोविड रूग्णसंख्येत अचानक झालेली वाढ बघता, हे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळते आहे. जीनोम सिक्वेन्सिंगच्या डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन अधिक प्रमाणात उत्परिवर्तित होत असल्याचे दिसते आहे. डेल्टामध्ये सापडलेल्या १८ च्या तुलनेत स्पाईक प्रोटीनमध्ये ३० पेक्षा जास्त उत्परिवर्तन असल्याचे दिसते आहे. नवीन कोविड प्रकार लस घेतलेल्यांसाठी एन्टीबॉडिज बनवते. त्यामुळे अधिक संक्रमण होते आहे.

omicron updates

Omicron ची लक्षणे आतापर्यंत 'सौम्य'

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या प्राथमिक अहवालात, ज्यांनी ओमिक्रॉन (Omicron) प्रकार शोधला त्या पहिला माणसात ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य होती असे म्हटले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये घसा खवखवण्याऐवजी थकवा, अंगदुखी घसा खवखवणे यासारखी सौम्य लक्षणे दिसून येतात. नाक चोंदलेले, नाक बंद झाल्याची कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत. तसेच या व्हरियंटमुळए प्रभावित झालेल्या लोकांनी खूप जास्त प्रमाणात ताप न आल्याचे सांगितले. बहुतेक लक्षणे स्वतहून बरी होत आहेत. तर, डेल्टा व्हॅरियंटमध्ये ताप, थकवा आणि खोकला ही सामान्य लक्षणे आढळत आहेत. तर अनेक लोकांमध्ये ही लक्षणे तीव्र असल्याने त्यांच्यात गंभीर लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले. काहीतर ICU मध्ये दाखल होते. पण आतापर्यंत ओमिक्रॉनमध्ये कोणतीही गंभीर प्रकरणे आढळलेली नाहीत.

injection

कोरोनाचे लसीकरण आणि रूपे

आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी कोविड-19 लसींना यश आले आहे. ज्या लोकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाही लागण होऊ शकते, पण त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. पण अपवादात्मक परिस्थितीत काहींना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकतो. स्पाइक प्रोटीनमधील 30+ उत्परिवर्तनांसह, कोणत्याही गोष्टीचा अंदाज लावणे खूप लवकर होते आहे. मात्र ओमिक्रॉनमध्ये लस आणि नैसर्गिक संसर्गापासून बचाव करण्याची क्षमता आहे, असे तज्ञांनी सुचवले आहे. सध्याच्या व्हर्जनसाठी अद्ययावत लस विकसित करण्याचा दावा लस उत्पादक कंपन्या करत आहेत. भविष्यात उपलब्ध कोविड-19 लसींमध्ये फेरबदल केले जातील, असे तज्ज्ञ सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT