Sakal - 2021-03-01T160757.361.jpg
Sakal - 2021-03-01T160757.361.jpg 
health-fitness-wellness

आपल्या पोटाच्या आरोग्याची काळजी घ्या; पोट आपल्या आरोग्याची काळजी घेईल!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. जंक फुडचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, बैठे काम अशा घातक जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येते. तरुणांमध्ये अशा विकारांचे प्रमाण अधिक आहे. पचनक्रिया चांगली नसेल तर बद्धकोष्ठ, आतड्यांतील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा पित्त (अॅसिडिटी) असे आजार होऊ शकतात. पोटाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी, मद्याच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे. चयापचय प्रक्रियेत व्यत्यय, चुकीचा आहार, मानसिक ताणाव यांचा थेट परिणाम पचनक्रियेवर होताना दिसून येतो.

....यामुळे जठर व लहान आतड्यांना संसर्ग

प्रौढांमध्येही मोठ्या प्रमाणात पचनक्रियेसंबंधी आजार दिसून येतात. अपचन, गॅस, पोटफुगी अशा तक्रारींचा सामना उतारवयात करावा लागतो. वय झाले की सांध्यांची हालचाल मंदावते, तशीच आतड्यांची हालचालही कमी होते. त्यामुळे अन्नमार्गातून अन्न संथपणे पुढे सरकते. त्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवतो. पोट जड होते व बद्धकोष्ठाचा (Constipation) त्रास सुरू होतो. मंदावलेल्या हालचालींमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर बराच वेळ जाऊनही पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही. एच. पायलोरी या जंतूमुळे जठर व लहान आतड्यांना संसर्ग होतो. अंगावर एक प्रकारचे आवरण असणारा हा जंतू अशुद्ध पाण्यातून जठरात प्रवेश करतो आणि विशिष्ट कालावधीत योग्य उपचार न घेतल्यास अल्सर वा त्यापेक्षा अधिक बिकट आजार ओढवू शकतात.

शरीरात १३ प्रकाराचे अग्नि

बऱ्याच वेळा योग्य व वेळेत निदान न झाल्याने पोटाचे आजार बळावतात आणि मग मोठमोठ्या शस्त्रक्रिया आणि खर्च सोसावा लागतो. पोटाचे आजार बऱ्याच वेळा रुग्ण आणि डॉक्‍टरांच्याही उशिरा लक्षात येतात. त्यातही गैरसमजूत आणि निष्काळजीपणा यांमुळे शास्त्रशुद्ध आणि नेमके उपचार मिळण्यास विलंब होत जातो. त्यातून पुढे गुंतागुंत वाढते. आपल्या शरीरात १३ प्रकाराचे अग्निआहेत यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जाठराग्नि. या जाठराग्निवर इतरसर्व अग्नीचे कार्य अवलंबून असते.प्राकृत अग्नि ही सर्व रोगांनादूर ठेवते, तसेच अग्नि मंद झाल्यावर सर्व रोगांना आमंत्रण मिळते.

चुकीच्या खाण्या पिण्याच्या पद्धतीने बिघडते पोट

-आपल्या खाण्या पिण्याचा पद्धतीचा खूप परिणाम अग्नीवर येत असतो. चुकीच्या खाण्या पिण्याच्या पद्धती, preservative food,canned food, wafers यांमध्ये पौष्टिक तत्वे नसते. त्यामुळे आपल्या Immunity वर त्याचा परिणाम येतो.काही चुकीचा जेवणाच्या पद्धती जसे टेबलं खुर्ची वर बसून जेवणे, भटकत, येताजाता, हातात ताट घेऊन जेवणे या सगळयांचा अग्नीवर विकृत परिणाम येतो.

-जेवणाची सगळ्यात सुंदर पद्धत म्हणजे जमिनीवर मांडी घालून बसणे.

-अन्नासोबतच पाण्याचाही परिणाम अग्नीवर येत असतो. आपल्या पोटाचे ४ भाग केले.तर त्यातले २ भाग अन्न,१ भाग पाणी व १ भाग वायूचा चालनवलनासाठी राखला पाहिजे. जेवण करताना मधेमधे घोटघोट पाणी सेवन करावे ज्यामुळे chuming चा वेळेस ओलावा मिळतो.आहार हा षडरसात्मक असावा. एकच रसाचे नित्यसेवन झाले तर ते रोगाला आमंत्रण दिले जाते. 

-अवेळी जेवणं, भूक नसतानाही जेवणं,अतितिखट, मसालेदार अशा प्रकारचा आहारामुळे अम्लपित्त, छातित जळजळ असे लक्षणे उद्भवतात. 

-छातीत जळजळ, Acidity होत असल्यास तत्पुरते उपाय केले जातात पणजसे दही असलेल्या भांड्यात कितीही दूध घातले तरी त्याचे दहीच होते. त्यामुळे अम्लपित्ताचा त्रास असल्यास त्याचा औषध व पंचकर्मासोबत समूळ नाश करावा.

-भयंकर डोकं दुखत असल्यास विशिष्टऔषधांचे (सूतशेखर रस) प्रधमन नस्याचाखूप चांगला परिणाम दिसून येतो.

-त्याचसोबत अम्लपित्तामध्ये वमन कर्मानंतर औषधेवापरल्यास चांगला परिणाम येतो.

-पोटाच्या तक्रारीमध्ये महत्वाची तक्रार म्हणजे आव पडणं किंवा प्रवाहिका यामध्ये इंद्रयव/ कुड्याचे पान उगाळून पोटात घेतल्यास व पंचकर्मातील पिच्छाबस्ती त्याचा फायदा होतो. आव पडण्याचे कारण म्हणजे नित्य Bread, बाहेरचे खाणे हे आहे.

-IrritableBowel syndrome मध्ये पोटात दुखणं, नुसते मनात विचार आले तरी motion ला होणं या तक्रारीमध्ये पंचकर्मातील शिरोधारा, रोजचा जेवणात धने पावडर सेवन करावी.

अशाप्रकारे अग्नि प्रज्वलित असला तर मनुष्याला निरोगी,समृद्ध जीवन जगता येते.

-लक्षणे

-बद्धकोष्ठ

-छातीत जळजळणे किंवा दुखणे

-पोटात फुगवटा आणि वात येणे (ब्लोटिंग)

-उलटी येणे

-पित्त

-आतड्यातील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम)

-पित्ताचा खडा (गॅल स्टोन्स)

-वारंवार बद्धकोष्ठ (ऑब्स्ट्रक्‍टेड डेफिकेशन सिंड्रोम)

-वारंवार शौचास जावे जाणे

-बराचवेळ कुंथणे

-अपूर्ण मलविसर्जन

-गुदमार्गावर किंवा इंद्रियांवर दाब टाकावा लागणे

-मलविसर्जनाला गती देणाऱ्या रेचक औषधांचा वापर करावा लागणे

घरगुती उपचार

आले : पेलाभर पाण्यात बारीक किसलेले आले घालून ते उकळून घ्यावे. हे पाणी थंड झाल्यावर त्याचे सेवन करावे.

केळे : आणि हिरव्या पालेभाज्या: यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठासारखी समस्या उद्भवत नाही. पचनासंबंधी तक्रारीही दूर होतात.

अंजीर: यामध्ये असलेले प्रोटीन पचनास उपयुक्त ठरते.

पुदीना: पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

जिरे: गॅसच्या समस्येवर गुणकारी. सकाळी काही खाण्यापूर्वी थोडीशी जिरे पावडर घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT