walking is safe in corona time  Esakal
health-fitness-wellness

कोरोना काळात वॉक ला जाणे सुरक्षित आहे का? डॉक्टर काय म्हणतात जाणून घ्या

कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने परत लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचे रूग्ण (Corona) वाढत असल्याने परत लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. सरकारनेही पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये आणि सुरक्षित राहावे यासाठी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाउन देखील लागू केले आहेत. त्यामुळे लोकांना सकाळ-संध्याकाळ वॉक (Walk) ला जाणे सुरक्षित आहे का? असे वाटायला लागले आहे. याविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे.

Morning walk

पहाटे व्यायाम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

निओ हॉस्पिटले डॉ. अकिंत जैन यांनी शक्य असल्यास घरीच व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी तब्येत बघून बाहेर फिरायला जाणे गरेजेच आहे, असे सांगितले असल्यास योग्य काळजी घेऊन घराबाहेर पडावे. पण सामाजिक अंतर आवर्जून पाळावे असेही ते सांगतात. तिसऱ्या लाटेची शक्यता बघता सरकारने पुन्हा नव्याने निर्बंध लादले असले तरी यावेळी लोकांनी व्यायाम न सोडल्याचे दिसून येत आहे.अनेक लोकं व्यायामासाठी एकत्र येत आहेत. यावर डॉ. जैन यांनी लोकांना पहाटे फिरण्याचा सल्ला दिला आहे. पहाटे ४.३० ते ५ दरम्यान कोणीही फिरायला जात नाही. अशावेळी तुम्ही लवकर उठून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याने तुम्हाला फायदाच होईल. फिरायला गेल्यावर बेंचवर बसू नका. किंवा कुठेही स्पर्श करू नका. घरी गेल्यावर लगेच आंघोळ करा. स्वच्छता राखा. मधुमेही, जास्त वजन असलेल्या लोकांनी मात्र आवर्जून सगळी काळजी घेत व्यायाम करायला हवा.

walking

१५-२० मिनिटांचे चालणे फायदेशीर ठरेल

तुमच्या भागात रूग्णसंख्या कमी असेल तर, अशावेळी तुम्ही मास्क घालून तुम्ही जवळच्या परिसरात 15 ते 30 मिनिटं फिरायला जाऊ शकता, असेही डॉक्टर सांगतात. पण फिरायला जाताना फार लोकांशी बोलत थांबू नका. गर्दी टाळा. कारण सध्याचा संसर्ग वेगाने पसरतो आहे. त्यामुळे काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT