hair care
hair care esakal
health-fitness-wellness

winter Hair Care:हिवाळ्यात केसांची निगा कशी राखाल?

सकाळ डिजिटल टीम

केसांची निगा राखणं (Hair Care) हे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यासाठी कोणतं पाणी वापरता हे सुद्धा महत्वाचं ठरतं. हिवाळ्यात तर केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे योग्य पाणी वापरून केस धुतल्याने तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहाते. पण, हिवाळ्यात नियमित वॉश (Wash) आणि स्टाईल (Style) पुरेशी नाही, तर केसांची निगा राखणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रसिद्ध हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब (Javed Habib) यांच्या टिप्स.

Hair Loss

ही घ्या काळजी (Hair Care)

- मोहरीचे तेल हे केसांसाठी अतिशय चांगले आहे. केस धुण्यापूर्वी ५ मिनिटे हे तेल लावा. त्यामुळे केस मुलायम तर होतीलच शिवाय हे तेल कंडीशनरसारखे काम करते.

- अॅलो व्हेरा जेल आणि ऑलिव्ह ऑइल समप्रमाणात घेऊन ती पेस्ट केसांवर लावा. दहा मिनिटे तशीच ठेवून शाम्पूने धुवा. त्यांनी तुमच्या केस चमकदार होतील.

- केसात टाळूला समस्या असेल तर दही फायदेशीर ठरेल. यासाठी ताजे दही आणि बेबी ऑईल समप्रमाणात घ्या. चांगले एकत्र करून पातळ पेस्ट करा. ही पेस्ट तेल आणि टाळूला पाच मिनिटे लावून मसाज करा. त्यानंतर नेहमीच्या शाम्पूने धुवा.

- अॅलो व्हेरा लिंबू एकत्र करून लावल्याने कोंड्याची समस्या दूर होईल. यासाठी २ चमचे अॅलो व्हेरा जेल आणि अर्धा चमचा ताज्या लिंबाचा रस एकत्र करा. चांगले एकत्र करून केस धुण्यापूर्वी ५ मिनिटे लावून ठेवा.

- ऑलिव्ह, नारळ, बदाम, एरंडेल आणि व्हिटॅमिन ई तेल समप्रमाणात घ्या. ते एकत्र चांगले मिसळा आणि धुण्यापूर्वी 10 मिनिटे केसांवर लावा. यामुळे केस हेल्दी राहतील.

hairwash

गरम पाणी नकोच (Avoid Hot Water)

गरम, कडकडीत (Hot Water) पाण्याने केस धुण्याची सवय अनेकांना असते. अशी सवय असेल तर केस हमखास कामातून जातात. जावेद सांगतात, की थंड पाण्याने केस धुणं हे सगळ्यात फायदेशीर आहे. यामुळे केसातील घाण, कचरा, दूषित घटक आणि केसांना लावलेला शाम्पू नीट निघून जाऊन केस स्वच्छ होतात. तर गरम पाण्याने केसांचे पोषण योग्य होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT