creepy skin esakal
health-fitness-wellness

वय नसतानाही डोळ्यांमुळे म्हातारे दिसताय? जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

वाढत्या वयाचे संकेत आपल्याला डोळ्यांभोवती दिसतात. आपले वय वाढते तसे डोळ्यांशी संबंधित समस्या, डोळ्याखाली काळे डाग पडणे, सुरकुत्या येणे, आदी समस्या दिसू लागतात. वाढत्या वयासह सुरकुत्या होण्याचे प्रमाण सामान्य आहे. मात्र, काही महिलांना डोळ्यांसंबधित लक्षणे (eyes health issue) फार कमी वयात जाणवतात. तुम्हीही जर तरुण वयात वृद्ध दिसायला लागले असेल तर त्याची कारणं नेमकी काय आहेत? हे आपण पाहुयात. (know about resons behind why eye looks older than you)

वारंवार सूर्याच्या संपर्कात येणे -

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये पिगमेंटटेशन आणि मेलेनोमासारख्या समस्यांचा समावेश आहे. यासाठी महत्वाचे कारण म्हणजे सूर्यप्रकाश. यापासून सुटका हवी असेल तर चेहऱ्याला स्कार्फ बांधायला विसरू नका आणि सनस्क्रीनशिवाय कडक उन्हात बाहेर पडू नका. त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण होईल.

डोळे खूप चोळणे -

कधीकधी डोळ्यात धूळीचे कण किंवा इतर कोणती गोष्ट गेली तर आपण विचलित होते. तेव्हा आपण अचानक डोळे चोळू लागते. मात्र, असे केल्यामुळे त्यासभोवतालच्या त्वचेवरील रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे डोळ्याखाली गडद रंगाचे डाग देखील तयार होऊ शकतात. डोळ्यातील जळजळ दूर करण्यासाठी डोळे चोळण्याऐवजी पाण्याने डोळे चांगले धुऊन किंवा गुलाब जलचा वापर करा.

अनुवांशिक घटक -

ज्या वेगाने महिलांचे वय वाढते त्यामध्ये अनुवांशिकता देखील महत्वाची भूमिका निभावते. आपले पालक किंवा आजी-आजोबांना तरुण वयातच सुरकुत्या किंवा गडद रंगाचे डाग आले असतील तर तुम्हा देखील लहान वयात या समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

मेकअपमुळे त्वचेची जळजळ -

कालबाह्य झालेले मेकअप वापरल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते. झोपेच्याआधी मेकअप न काढल्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते आणि वृद्धत्वाची लक्षणे तीव्र होतात. बर्‍याच दिवसांपासून त्वचेवर मेकअप साफ न केल्यामुळे छिद्रही बंद होतात. त्वचेची योग्य काळजी न घेण्यामुळे आणि मेकअपचा जास्त वापर केल्याने कोलेजेन खराब होते, ज्यामुळे सुरकुत्या होऊ शकतात.

झोपेचा अभाव -

एका प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे आठ तास झोपेची आवश्यकता असते. आपल्या झोपेच्या गुणवत्तेत घट झाल्यास आपण वृद्ध असल्याचे दिसून येते. अपुरी झोप ही गडद रंगाचे डाग तयार होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. कारण झोपेच्या कमतरतेमुळे, आपल्या डोळ्यांखालील रक्तवाहिन्या विरघळतात आणि दिसणारे गडद डाग तयार होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT