health-fitness-wellness

कुलरमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या काय आहे डॉक्टरांचं मत

अथर्व महांकाळ

नागपूर : देशात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातही (Maharashtra corona update) स्थती भयावह होत चालली आहे. त्यात उन्हाळा असल्यामुळे उकाडा प्रचंड वाढतोय. अनेकांनी घरी कुलर किंवा AC (Cooler and AC) सुरु केले आहेत. मात्र तुमच्या आजूबाजूला कोणी कोरोना रुग्ण असतील आणि तुम्ही कुलर लावत असाल तर कुलरच्या माध्यमातूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांच्या अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आम्ही जाणून घेतलयं. (know doctors opinion about spreading corona virus through Coolers)

हवेच्या माध्यमातून कोरोनाची लागण होऊ शकते का?

नियमानुसार दोन व्यक्तींमधील अंतर हे ६ फुटांपेक्षा कमी असल्यास आणि त्यापैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्यास दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र तुमच्या घराशेजारी किंवा परिसरात कोणाला कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांच्या मार्फत हवेत पसरणारे कोरोना विषाणू काही विशिष्ट अंतरापर्यंत पसरू शकतात. मात्र हे अंतर जास्त असेल तर तुम्हाला संसर्गाचा कुठलाही धोका नाही असं डॉक्टर तिलोत्तमा पराते सांगतात.

कुलरच्या हवेमुळे कोरोना होऊ शकतो का?

कुलर बाहेरच्या वातावरणातील हवा आपल्याकडे ओढून थंड करण्याचं काम करत असतो. त्यामुळे जर बाहेरच्या वातावरणात कोरोना विषाणू असतील तर ते घरातही येऊ शकतात असं काही लोकं म्हणतात. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या घरात आणि तुमच्या घरात जास्त अंतर असल्यास कोरोनाच्या संसर्गाचा कुठलाही धोका नाही असंही डॉक्टर पराते सांगतात.

कोरोना रुग्ण घरी असल्यास कुलर टाळा

जर तुमच्या घरी कोरोना रुग्ण गृह विलगीकरणात असेल तर घरी कुलर सुरु ठेवणं टाळा. कुलरच्या थंड हवेमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढण्याची भीती असते. यासाठी कुलर लावण्याच्या काही विशिष्ट्य वेळा ठरवून घ्या. गरजेनुसारच कुलर लावा.

घरी कुलर असल्यास हे करा

  • कुलरच्या पाण्यात सॅनेटाईझर किंवा कुठलेही अँटिसेप्टिक लिक्विड टाकू नका. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

  • कुलरचं पाणी सतत बदलत राहा.

  • कुलर असलेल्या रूममधील एक खिडकी सतत उघडी ठेवा. यामुळे घरात हवा खेळती राहील.

  • कुलरचा गरजेपेक्षा अधिक वापर टाळा.

कुलरमुळे कोरोना संसर्गाचा कुठलाही धोका नाही. मात्र योग्य ते नियम पाळणं आणि काळजी घेणं आवश्यक आहे.
- डॉक्टर तिलोत्तमा पराते, मेयो रुग्णालय, नागपूर

(know doctors opinion about spreading corona virus through Coolers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT