health-fitness-wellness

ओलसर वातावरणात फोफावतो म्युकरमायकोसिस; जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः पोस्ट कोविडनंतर (Coronavirus) अनेकांच्या मनात म्युकरमायकोसिसने (Mucormycosis) धडकी भरवली आहे. या बुरशीला हरवायचे असेल तर उत्तम प्रतिकारशक्ती (Immunity Power) व तज्ज्ञांकडून वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे, असे मत कॅन्सर स्पेशलिस्ट डॉ. जयप्रकाश बारसकर यांनी व्यक्त केले. (know doctors opinion over how to cure mucormycosis)

कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांवर स्टेरॉईडचा वापर कोविडकाळात मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाबाधितांच्या शरीरात आधीपासूनच इतर काही व्याधी, रोग असतील तर त्याची प्रतिकारशक्ती यामुळे कमी होते. अशावेळी रुग्ण जर हॉस्पिटलमध्ये काही काळ भरती असेल तर बुरशीला फोफावण्यास योग्य असे मॉइस्ट (ओलसर) वातावरण मिळते. विविध बाबींद्वारे त्या बुरशीचा जबडा, नाक, घसा इत्यादी ठिकाणी शिरकाव होतो व संसर्ग जास्त वाढल्यास अख्खा जबडा काढावा लागतो. काहीवेळा अंधत्वही येते. मेंदूपर्यंत ही बुरशी पोचल्यास मृत्यूही ओढवतो, असे ते म्हणाले.

उपचार :

  • ॲण्टीफंगल औषधी

  • इंजेक्शन

काय काळजी घ्यावी :

  • घर, शरीर, परिसराची स्वच्छता राखावी

  • शंका आल्यास त्वरित निदान करुन उपचार घ्यावे

यांना जास्त धोका :

  • डायबेटिक पेशंट

  • ब्लडप्रेशरचे रुग्ण

(know doctors opinion over how to cure mucormycosis)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT