Tips to sleep well read full story  
health-fitness-wellness

रात्री शांत झोप लागत नाही? मग हे उपाय करा आणि घ्या 'चैन की निंद'

अथर्व महांकाळ

नागपूर : झोप म्हणजे आपल्यापैकी कित्येक जणांचा सर्वात आवडता विषय. जर तुमच्याकडे वेळच वेळ आहे तर तुम्हाला कोणते काम करायला आवडेल असे विचारले तर तब्बल ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे उत्तर 'झोपणे' हेच असेल यात शंका नाही. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप आवश्यकही आहे. काही लोक अगदी कुंभकर्णासारखे तासंतास झोपतात. मात्र अनेकांना झोप न येण्याची किंवा शांत झोप न लागण्याची समस्या असते. कितीही थकून घरी आले अनेकांना शांतपणे झोप लागत नाही. मात्र आता चिंता करू नका. शांतपणे झोप येण्यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर जाणून घेऊया. (Best Tips to sleep well)

शांत झोप न येण्याची कारणे (Reasons to not getting sleep)

  • वेळेचे चुकीचे नियोजन 

  • कामाचा आणि वयक्तिक आयुष्यातील ताण, तणाव

  • शरीरातील कमजोर पचनशक्ती 

  • दिवसभरातील नकारात्मक गोष्टींचे विचार 

  • आहारातील तेलकट आणि तिखट पदार्थ

हे उपाय करा आणि घ्या चैन की निंद (Tips to get well sleep)

  • शांत झोप लागण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि उत्तम उपाय म्हणजे झोपण्याच्या वेळेचे अचूक नियोजन. आपल्याला साधारणतः किती वाजता झोप येते आणि आपली झोप किती वाजता पूर्ण होते हे ठरवून घ्या. नियमित त्याचवेळी झोपा आणि नियोजनानुसार उठा. तुम्हाला शांत झोप येईल.

  • आपल्या वयक्तिक आयुष्यातील आणि सामाजिक आयुष्यातील गोष्टींचा ताण घेऊ नका. जर तुम्ही तणावात असाल तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही. म्हणून झोप लागण्यापूर्वी तुमच्या आवडीची गाणी ऐका किंवा आवडीचे पुस्तक वाचा. 

  • शांत झोप लागण्यासाठी रात्री झोपताना कपभर कोमट दुधात एक चमचा मध घालून प्या. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. 

  • रोज रात्रीचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास पायी फिरणे फायदेशीर आहे. यामुळे तुमची पचनशक्ती उत्तम राहते आणि तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. 

  • रात्रीच्या जेवणात तेलकट, आंबट आणि अतितिखट पदार्थांचा समावेश टाळा. रात्री थोडे कमी जेवण करा. म्हणजे जळजळ होणार नाही आणि झोप उत्तम येईल. 

  • रात्री झोपताना डोक्याला हलक्या हातांनी मालिश करा ज्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण उत्तम राहील आणि तुम्हाला शांत झोप लागेल. 

  • झोपताना तुमच्या तळपायाला नारळाचे तेल चोळून घ्या यामुळे तुम्हाला नक्कीच उत्तम झोप लागेल. 

  • झोपताना सैल आणि शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला. ज्यामुळे तुम्हाला झोपण्यात अडचण येणार नाही आणि डासांपासूनही संरक्षण होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

माझी ओळख, माझे नाव, माझा चेहरा... गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; २.५० कोटींचा नुकसानीचा दावा, नेमकं काय प्रकरण?

Latest Marathi News Live Update : भिवंडी-ठाणे मार्गावरील फर्निचर मार्केट जळून खाक

Krishna River Pollution: कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात! सातारा, सांगली पट्ट्यात पाण्याची गुणवत्ता खालावली; ‘प्रदूषण’चा शासनास अहवाल..

HDFC Bank Chairman: कोण आहेत अतनू चक्रवर्ती? गुजरातचे माजी IAS ते HDFC बँकेचे चेअरमन आणि आता अचानक राजीनामा

SCROLL FOR NEXT