Learn about antibodies
Learn about antibodies 
health-fitness-wellness

अँटीबॉडी कोरोना व्हायरससोबत कसा लढा देतात यासाठी वाचा. 

प्राजक्ता निपसे

पुणे : कोरोना व्हायरसपासून लढण्यासाठी अँटीबॉडीज महत्त्वाची भूमिका निभावतात. याच अँटीबॉडीज कसं करतात कोरोना पासून आपल्या शरीराचं संरक्षण, जाणून घ्या फायदे

कोरोना व्हायरससोबत (Corona Virus) लढण्यासाठी जगभरातील संशोधकांकडून वॅक्सिन (Vaccine) तयार करण्याचे खुओ प्रयत्न केले आहे. पण आतापर्यंत कुठल्याही देशाला हे यश अद्यापही मिळालं नाहीय. पण या संशोधकांनी सांगितलेल्या नियमांचं पालन केलं, तर आपण कोरोनापासून आपलं रक्षण करू शकतो. त्या संशोधकांच्या मते व्हायरस पासून बचाव करण्यासाठी आणखी अनेक उपाय आहेत. यात अँटीबॉडीचं महत्त्व अधिक आहे.

अँटीबॉडीद्वारे (Antibodies) व्हायरस शरीरात पसरण्यापासून तुम्ही थांबवू शकतो. तर मग आज आपण  जाणून घेऊया काय आहे. अँटीबॉडी आणि हे कशाप्रकारे कोरोनासोबत लढा देण्यासाठी मदत करते. 

अँटीबॉडी म्हणजे काय ?
अँटीबॉडीच्या मदतीनं व्हायरसचा परिणाम संपवू शकतो. अँटीबॉडी शरीरातील आपली इम्यून सिस्टिम साठी काम करतं. एखादी व्यक्ती जेव्हा कुठल्याही व्हायरसच्या संपर्कात येती तेव्हा शरीराच्या रक्तात आणि टिश्यूमध्ये असणारी अँटीबॉडी तयार होऊ लागते. या अँटीबॉडीच म्हणजे प्रोटीन्स असतात, जे व्हायरसला शरीरात पसरण्यापासून थांबवतात. कोरोनासोबत लढा देण्यासाठी याच अँटीबॉडी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. मात्र अनेकदा संक्रमणानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी उशीर लागतो.

अँटीबॉडीज बनण्यासाठी एक आठवड्यांचाहि काळ लागू शकतो. म्हणूनच कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकं अँटीबॉडी टेस्ट करवून घेत आहेत. टेस्टद्वारे आपल्याला कळत की, शरीर अँटीबॉडीज तयार करू शकत आहे की नाही. शरीरात अँटीबॉडी असेल तर असा समाज होतो की, आपण कोरोना व्हायरसच्या संपर्कात आहोत. 

कोरोना व्हायरससोबत अँटीबॉडी कश्याप्रकारे लढतात.
जर व्यक्ती कोविड-१९च्या संपर्कात आलेला आसेल तर त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात, त्या व्हायरससोबत लढतात. खूपवेळा त्या बनायला वेळ लागू शकतो. अनेक असे रुग्ण आहेत, जे कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर एक महिन्यानंतर पण अँटीबॉडी बनवत नाहीत. तर कोरोनामुळे बरे झालेल्या ज्या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी खूप काळानंतर बनतात, अशा रुग्णांच्या प्लाझ्माची गुणवत्ता कमी असल्याचं बोललं जातं. मग अशा रुग्णांच्या प्लाझ्माचा वापर कमी  करण्यात येतो. 

ज्या रुग्णांची इम्यूनिटी चांगली असते, त्यांच्या शरीरात अँटीबॉडी कमी काळात म्हणजे दोन आठवड्यांच्या आत तयार होतात आणि मग त्या वर्षांपर्यंत राहतात. असे रुग्ण प्लाझ्मा सहजपणे डोनेट करू शकतात. एकदा अँटीबॉडी तयार झाल्यानंतर त्यांचा प्लाझ्मा डोनेट केल्यास काही धोका नसतो. कोरोनाच्या दिवसांमध्ये रुग्णांना प्लाझ्माची खूप गरज असते. त्यामुळे बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा डोनेट करू शकतात आणि तरीही ते निरोगी असतात. मेडिकल एक्सपर्टच्या मते अँटीबॉडी शरीराला सुरक्षा देतात, मात्र किती काळापर्यंत त्या सुरक्षा देतील हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

संपादन - सुस्मिता वडतिले  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT