health-fitness-wellness

कोमट दुधासोबत चमचाभर तुपाचे फायदे जाणून घ्या

नीलेश डाखोरे

नागपूर : सध्याच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधी समस्या (Stomach problems) उद्भवणे सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि ॲसिडीटीच्या त्रासाशी (Problems with constipation and acidity) लढा देत आहेत. तशी तर ही एक सामान्य समस्या आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात. परंतु, तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता. (Learn-the-benefits-of-a-tablespoon-of-ghee-with-lukewarm-milk)

ही एक स्वदेशी रेसिपी आहे. ज्याचा आयुर्वेदिक डॉक्टरांनीही दावा केला आहे. याचा वापर केल्याने तुमची बद्धकोष्ठतेची अर्थात पोट साफ न होण्याची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते. सिपीसाठी एक चमचाभर तूप, एक ग्लास कोमट दूध किंवा पाणी इतकंच साहित्य लागते. याचे इतरही अनेक फायदे आहेत. याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

कोमट पाणी आणि तूप या घटकांचा आयुर्वेदिक औषधांच्या ‘गोल्डन बूक’मध्येही उल्लेख आहे. एक ग्लास गरम पाणी आणि एक चमचा साजूक तूप बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे. अनेकदा तुपाबद्दल गैरसमज पसरवले गेले आहेत. तुपाचे फायदे मिळविण्यासाठी त्याचे सेवन कसे करावे याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे मनात गैरसमज आहेत. तूप हे ब्युटीरिक अॅसिडचा समृद्ध स्रोत आहे. अभ्यासात असेही म्हटले आहे की ब्युटीरिक अॅसिडच्या सेवनाने आतड्यांसंबंधी चयापचयामध्ये सुधारणा होते. ज्यामुळे मल त्यागाची प्रक्रिया सोपी व त्रासविरहित होते.

तुपाचे या पद्धतीने सेवन केल्याने पोटदुखी, सूज येणे आणि बद्धकोष्ठतेच्या इतर लक्षणांपासूनही आराम मिळतो. आयुर्वेदिक आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तूप शरीरात चिकटपणा निर्माण करण्यास मदत करते आणि त्यामुळे आतडी व आजूबाजूचा भाग स्वच्छ राहतो. पॉलिश जर्नल प्रेजेग्लॅड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचाभर तुपाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी केली जाऊ शकते.

तूप हे एक उत्तम औषध

पोट साफ करण्यासाठी तूप हे एक उत्तम औषध मानले जाते. तूप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि चांगली झोप येते. हे वजन कमी करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते. तुपाच्या या स्वदेशी रेसिपीद्वारे तुम्हाला अधिक फायदे मिळवायचे असतील तर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. आपणास हवे असल्यास आपण एक चमचाभर तूप गरम पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून पिऊ शकता.

चमकदार त्वचा

साजूक तुपामुळे त्वचेतील पेशी पुन्हा पुनरुज्जीवित होतात. यामुळे त्वचा चमकदार होते. सोबतच त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

लठ्ठपणा होतो कमी

साजूक तूप शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदत करतात. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते.

(Learn-the-benefits-of-a-tablespoon-of-ghee-with-lukewarm-milk)

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT