File photo 
health-fitness-wellness

लॉकडाऊनने आली नागरिकांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमी 

प्रमोद चौधरी

नांदेड : लॉकडाउनमध्ये सतत चार भिंतीच्या आड राहिल्याने शरीराला ‘ड’ जीवनसत्व मिळाले नसल्याने गेल्या काही महिन्यामध्ये ‘ड’ जीवनसत्व अभावाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. सतत चिडचिडेपणा, आळस येणे, केस पांढरे होणे असे याची लक्षणे असल्याचे डॉ. शशीकांत देशपांडे यांनी सांगितले. 

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लॉकडाउन घेण्यात आले. नांदेड जिल्ह्यात सुध्दा लॉकडाउन लावल्याने मार्च एप्रिलपासून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. अत्यंत गरजेच्या वेळी सोडल्यास २४ तास घरातच राहून कोरोना संक्रमणापासून बचाव करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. याचा अवलंब अनेक शहर तथा ग्रामीण भागातील नागरिकांनी कटाक्षाने केला. दरम्यान, सतत घरात राहिल्याने शरीराला सूर्यकिरणांचा स्पर्श झाला नाही. याचा परिणाम शरीराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्वापासून वंचित राहावे लागले. परिणामी त्याचा शरीरावर विपरीत परिणाम घडून यायला सुरवात झाली आहे. 

हेही वाचा - नांदेड : शेतकरी आंदोलनात राजकारण असून कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी- पाशा पटेल
  
'ड' जीवनसत्वासाठी सूर्य आहे प्रमुख स्रोत 
शरीराला आवश्यक असलेल्या इतर जीवनसत्वाप्रमाणेच ‘ड’ जीवनसत्वही गरजेचे आहे. ‘ड’ जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत सूर्य आहे. दररोज सकाळी सात ते नऊ व सायंकाळी चार ते सहा या वेळेत उन्हातून हे जीवनसत्व मिळत असते. यासाठीच पूर्वीच्या काळी या वेळेत उन्हात बसण्याची परंपरा होती. आता ते कालबाह्य झाले आहे. या वेळेत बहुतेकजण कामात असतात. यामुळे ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग व तक्रारीत वाढ झाली आहे. 

रोग प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक
विनाकारण थकवा, चिडचिडेपणा, डिप्रेशन, केस गळणे, हाडांची ठिसूळता अशा तक्रारी यामुळे होतात. प्रत्येक स्नायूंच्या कार्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ लागते. स्त्रियांच्या प्रजनन क्षमता वाढीसाठीही व्हिटॅमिन ‘डी’ची गरज असते. व्हिटॅमिन ‘डी’ कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. 
- डॉ. शशिकांत देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT