men health 
health-fitness-wellness

पुरूषांनो, पालक खाल्ल्याने तुम्हाला होतील ७ फायदे

महिलांप्रमाणेच पुरूषांनीही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

महिलांप्रमाणेच पुरूषांनीही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा पुरूष इतर जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या नादात स्वत:च्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. योग्य प्रमाणात जेवण केले नाही तर त्यांच्या तब्येतीवर त्याचे परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे पुरूषांन त्यांच्या डाएटकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे तुमचे आरोग्य आतून चांगले असायला हवे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते पुरूषांना आरोग्यसंपन्न राहायचे असेल तर त्यांनी हिरव्या भाज्या खाणे गरजेचे आहे. त्यासाठी पालक खाणे अधिक चांगले असल्याचे मानले जाते. या भाजीमुळे शरीराला अनेक प्रकारचे न्यूट्रिएंटंस मिळतात. ते फायद्याचेही आहे.

पालकाचे फायदे

पालक खाण्याचे ७ फायदे

१) पालकात आयर्न भरपूर असते. तो खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले होते. शिवाय एनर्जी आणि रक्ताची उणीव भासत नाही.

२) पालकात व्हिटॅमिन केही मोठ्या प्रमाणात असते. जे शरीरात कॅल्शियम शोषून घेते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

3) पालक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामुळे अनेक आजार दूर राहतात, तसेच शरीराची एकूण वाढ होण्यास मदत होते.

४) पालक खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

५) पालकात मॅग्नेशिअम आणि झिंक असते. त्यामुळे तुमचे शरीर रिलॅक्स राहते.

६) मानसिक आरोग्यासाठी पालक खाणे चांगले मानले जाते. त्यामुळे नियमित आहारात पालकाचा समावेश करणे गरजेचे आहे.

७) पालक खाल्ल्यावर लगेच तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे शरीर फिट राहते आणि वजनही जास्त वाढत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Wagholi Fraud: दुबई कॉल सेंटर घोटाळा उघड: अहमदाबादमध्ये बनावट ‘प्रमोटअप’ कॉल सेंटरवर छापा, वाघोलीतील उद्योजकाची ७०.८५ लाखांची फसवणूक

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT