migraine problem esakal
health-fitness-wellness

मटण, चायनिज, चॉकलेट, चहा-कॉफीमुळे वाढू शकते डोकेदुखी

आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो

सकाळ डिजिटल टीम

मायग्रेन ही समस्या व्यक्तीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे निर्माण होते. थोडक्यात आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर (Body) होतो. मायग्रेन डोकेदुखीचा एक प्रकार आहे . यामुळे उलट्या होणे, घाबरणे आणि डोक्यात मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. कधीकधी हे दुखणे सहन करण्याची क्षमता संपते. पूर्वी हा त्रास 35 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये जास्त होता. मात्र जीवनशैलीत (Lifestyle) बदल झाल्याने आता मायग्रेनची समस्या 20 ते 26 वर्षे वयोगटातील तरुणांमध्येही दिसून येते. मायग्रेनच्या दुखण्यामध्ये खाणे-पिणे खूप महत्त्वाचे आहे. मायग्रेन असलेल्या व्यक्तीला आपले आरोग्य (Health) खूप काळजीपूर्वक सांभाळावे लागते. काही पदार्थ खाणे त्यांना सोडावे लागतात.

mutton

हे पदार्थ व्यर्ज करा

१) मटण - मटण, हॅम, हॉट डॉग, सॉसेजेस यांसारख्या पदार्थांमध्ये नायट्रेट्स नावाचे पदार्थ असतात जे रंग आणि चव वाढवण्याचे काम करतात. हे सर्व पदार्थ मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये वाहणारे रक्त पातळ करतात, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होतो.

२) चायनिज- चायनिज जास्त खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. यात अजिनोमोटो वापरले जाते. ते थोडे जरी खाल्ले तरी त्याचा त्रास होऊ शकतो.

३) चॉकलेट- चॉकलेटमध्ये कॅफिन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे चॉकलेट खाल्लावर डोकेदुखीची समस्या वाढू शकते. जास्त डार्क चॉकलेट खाल्ल्याने अधिक त्रास होऊ शकतो.

४) चहा-कॉफी - काही आरोग्य तज्ञांच्या मते, कॅफिनमुळे मायग्रेनचा त्रास कमी करता येतो. पण जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास मायग्रेनचा त्रास वाढतो. तुम्ही जर दिवसातून अनेकदा चहा, कॉफी पित असाल तर मायग्रेनचा त्रास अधिक वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Dapoli Crime : जालगाव येथे जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; वडिलांच्या डोक्यावर व हातावर घाव

Pune News : महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख; प्रमाणपत्रासाठी १.०५ लाख अर्ज, यवतमाळ सर्वाधिक; पुण्यात ३,६८७ अर्ज

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

SCROLL FOR NEXT