Hearing Loss
Hearing Loss Sakal
health-fitness-wellness

6.3 कोटी भारतीयांना ऐकू येण्यात अडचणी! WHO च्या अहवालात स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

भारतातील मुरादाबाद शहर हे जगातील दुसरे सर्वात ध्वनी प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत नुकताच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (UNEP) वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट – २०२२ सादर केला आहे, संयुक्त राष्ट्राच्या या अहवालात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यानुसार भारतात ध्वनिप्रदुषणामुळे ऐकायला कमी येणाऱ्यांची म्हणजेच श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. या अहवालानुसार भारतातील ६.३ कोटी लोकांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो आहे. या लोकांना ऐकू येणे कमी झाले आहे.

भारतातील तरूणाई वेगाने गमावतेय श्रवणशक्ती

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे, उद्योग आणि संगीत ऐकणे यासारख्या कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे भारतातील तरुण मुलांची श्रवणशक्ती झपाट्याने कमी होत आहे. हीच परिस्थिती राहिली तर २०३० पर्यंत भारतात ऐकायला कमी येणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट म्हणजे १३० दशलक्षापेक्षा जास्त होईल. भारतातील १० पैकी दोन लोकं या समस्येवर उपचार करून श्रवणयंत्र वापरता, असे अहवालात म्हटले आहे.

जगभरातील १ अब्ज लोकांना ऐकायला त्रास

संगीत आणि मनोरंजनविषयक इतर प्रकार उच्च आवाजात दीर्घकाळ ऐकल्यामुळे जगभरातील १२ ते ३५ वयोगटातील सुमारे एक अब्ज लोकांच्या श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे, असे अहवालात म्हटले आहे.

असुरक्षित उपकरणांमुळे वाढतेय समस्या

जागतिक आरोग्य संघटनेच्या असंसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. बेंटे मिकेलसन याविषयी म्हणाले की, नाईट क्लब, कॉन्सर्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या आवाजामुळे लाखो किशोरवयीन आणि तरुणांच्या श्रवणशक्तीला धोका निर्माण झाला आहे. जेव्हा अनेक ऑडिओ उपकरणे, कार्यक्रम स्थळ किंवा समारोह सुरक्षित ऐकण्याचे पर्याय देत नाहीत तेव्हा हा धोका आणखी वाढतो, असे ते म्हणाले.

जोखमींबद्दल जागरूकता वाढवण्याचे आवाहन

युनायटेड नेशन्सच्या आरोग्य एजन्सीने सर्व देशांच्या सरकारांना नवीन जागतिक मानकांचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. त्याद्वारे श्रवण क्षमतेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याला हानी पोहोचवणाऱ्या जोखमींबद्दल जागरूकता वाढविण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT