Postpartum Depression reson 
health-fitness-wellness

महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशन कशामुळे येतं? ही लक्षणे दिसल्यास सावध राहा

प्रसूतीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येदियुरप्पा यांची नात सौंदर्या हिचा २८ जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू (Death)झाला. सौंदर्या फक्त ३० वर्षांची होती. व्यवसायाने डॉक्टर होती. तिला ४ महिन्यांपूर्वी मुलगा झाला होता. मुलाच्या जन्मानंतर सौंदर्याला नैराश्य (Depression) आले होते, असे बोलले जात होते. त्यामुळे प्रसूतीनंतर(Pregnancy) येणाऱ्या नैराश्याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गर्भधारणेनंतरचे नैराश्य किंवा ज्याला प्रसुतिपश्चात उदासीनता म्हणतात, ते काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.

Postpartum Depression

पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय?

याबाबत मानसशास्त्रज्ञ डॉ. स्वाती रॉय म्हणाल्या की, प्रसूतीनंतर पोस्टपार्टमचा त्रास होऊ शकतो. अनेक महिला याचा अनुभव घेतात. व्यवस्थित झोप न येणे, काहीही चांगले न वाटणे, मुलाविषयी आसक्ती नसणे, सारखं रडू येणे, मूड बदलणे ही त्याची लक्षणे असू शकतात. गरोदरपणाक इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, कॉर्टिसॉल सारखे हे खूप जास्त असतात, प्रसूतीच्या वेळी हे हार्मोन्स खूप कमी होतात. त्यामुळे हा बदल येतो. याला पोस्टपार्टम ब्लूज म्हणतात. ही लक्षणे दोन आठवड्यापर्यंत राहतात. पोस्टपार्टम डिप्रेशनची समस्या गर्भधारणेदरम्यान किंवा मुलाच्या जन्मानंतर एक वर्षापर्यंत सुरू असते. हा एक मानसिक आजार असून तो तुमच्या विचार, भावना किंवा कृतीवर नकारात्मक परिणाम करतो.

Depression

पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणे

प्रत्येक महिलेमध्ये याची वेगवेगळी लक्षणे असू शकतात. पण, अनेक महिलांमध्ये काही सामान्य लक्षणे असू शकतात. ती अशी आहेत.

- सतत उदास वाटणे

- चिडचिड आणि सतत चिंताग्रस्त वाटणे

- प्रमाणापेक्षा जास्त थकवा, आळस येणे

- डोके किंवा पोट दुखणे

- भूक न लागणे, खाण्याची इच्छा नसणे

- कुठलेही काम करण्यात रस नसणे

- मुलाबरोबर संबंध वाढविण्यात अडचणी येणे

- सारखे रडावेसे वाटणे आणि खूप काळ उगाच रडू येणे

- कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांपासून वेगळे राहावेसे वाटणे, एकटेच राहणे

अमेरिकन हेल्थ वेबसाईट medicalnewstoday.com च्या मते पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना करणाऱ्या महिलांना स्वत:ला नुकसान पोहोचवण्याविषयी किंवा आत्महत्या करावी यासारखे विचार येऊ शकतात. मात्र हे प्रमाण कमी आहे.

नियंत्रण कसे मिळवता येईल?

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात, त्याचप्रमाणे बाळाच्या जन्मानंतरही स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होत असतात. यामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोनल बदलांचा थेट परिणाम स्त्रीच्या वागणुकीवर होतो. त्यामुळे अशा समस्या निर्माण होतात. भरपूर आराम करणे, चहा कमी पिणे, गर्भवती झालेल्या महिलेला आधार देणे, संतुलित आहार, मुल झोपल्यावर आईनेही चांगली झोप घेणे या गोष्टींद्वारे आपण आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो, असं स्वाती सांगतात.

पोस्‍टपार्टम ब्‍लूज आणि पोस्टपार्टम सायकोसिस-डिप्रेशनमध्ये फरक

पोस्‍टपार्टम ब्‍लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणे सारखीच असतात. पण जेव्हा डिप्रेशन येते तेव्हा लक्षणांचा प्रभाव वाढतो. अशावेळी आईला भ्रम होऊ शकतो. आवाज एेकायला येऊ शकतात. मुलाला नुकसान पोहोचवण्याचे विचार येतात. तसेच आत्महत्या करावीशी वाटते. जर अशी लक्षणे दिसायला लागली तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. अशावेळी रूग्णालयात दाखल करावे लागू शकते. पण, हे टाळता येऊ शकते. जर अशी लक्षणे दिसायला लागली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT