health-fitness-wellness

मॉर्निंग बनाना डाएटचे फायदे

मृणाल तुळपुळे

सकाळचा नाश्‍ता हा शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्‍यक असतो, ही बाब लक्षात घेऊन २००८ मध्ये जपानमध्ये ‘आसा बनाना डाएट’चा उगम झाला. जपानी भाषेत ‘आसा’ शब्दाचा अर्थ आहे सकाळ, त्यामुळे ह्या डाएटला मॉर्निंग बनाना डाएट असेदेखील म्हणतात. जपानमध्ये हे डाएट अल्पावधीतच इतके लोकप्रिय झाले, की तेथील सुपर मार्केटमध्ये केळ्यांचा तुटवडा भासू लागला! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॉर्निंग बनाना डाएटनुसार सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ग्लासभर कोमट पाणी प्यायचे. त्यानंतरचा नाश्‍ता म्हणजे या डाएटमधला महत्त्वाचा भाग आहे. त्या वेळी आपल्या प्रकृतीनुसार दोन किंवा तीन केळी खायची व त्यावर कोमट पाणी प्यायचे. केळ्यांबरोबर कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराचा चयापचय दर वाढतो आणि वजन घटण्यास मदत होते. सकाळी केळी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साही वाटते. हा नाश्‍ता पोटभरीचा असल्यामुळे त्यानंतर लगेच भूक लागत नाही. भूक लागलीच, तर परत केळेच खायचे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात मात्र गोड पदार्थ सोडून नेहमीचे पदार्थ खाण्याची मुभा असते. एखादवेळी दुपारी तीनच्या आधी चॉकलेटची वडी किंवा गोड बिस्कीट खाल्ले तर चालते. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे डाएट करताना केळी खायची ती कच्ची, काळे डाग पडलेली किंवा उतरलेली नसावीत, तर व्यवस्थित पिकलेली असावीत. अशा केळ्यांच्या जोडीने नाश्‍त्याला एखादे सफरचंद किंवा दूध चालू शकते. 

मॉर्निंग बनाना डाएट करणे सोपे वाटत असले, तरी ते करताना काही बंधने पाळावी लागतात व त्यामुळे दिनक्रम थोड्या फार प्रमाणात बदलावा लागतो. 

बनाना डाएट करताना...
 चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्‍स असे कोणतेही पेय न घेता फक्त पाणी प्यावे. 
 दिवसभर मधून मधून कोमट पाण्याचे लहान घोट घ्यावेत. 
 रात्रीचे जेवण शक्‍यतो संध्याकाळी ६ ते ८ 
या वेळेत घ्यावे. 
 जेवण आणि झोपण्याच्या वेळेत किमान चार तासांचे अंतर हवे.  

डाएटचे फायदे
वजन कमी होते व आरोग्य चांगले राहते. 
पचनक्रिया सुधारण्यासाठी व पोट साफ ठेवण्यासाठी उपयुक्त. 
शरीरातील टॉक्‍सिन्स बाहेर टाकली जातात व त्यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात 
रात्री चांगली झोप लागते व दिवसभर उत्साही वाटते. 
निरोगी जीवन जगण्यासाठी आसा बनाना डाएट हा एक उत्तम व आरोग्यदायी पर्याय आहे, त्यामुळे आजही जपानमध्ये अनेक लोक हे डाएट करतात.

बनाना स्मूदी 
एका मध्यम आकाराच्या केळ्यात ११० उष्मांक, २ ग्रॅम प्रथिने, २८ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, १५ ग्रॅम साखर. ३ ग्रॅम तंतूमय पदार्थ आणि ४५० ग्रॅम पोटॅशियम असते. 

साहित्य : १ केळे, १ सफरचंद, ५ भिजवून सोललेले बदाम, १/२ कप दूध, १ चमचा मध. 
कृती : केळे व सफरचंदाचे तुकडे करून घ्यावे. केळे, सफरचंद, बदाम, मध व दूध मिक्‍सरच्या भांड्यात घालून बारीक करावे व ग्लासमध्ये ओतावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT