children
children esakal
health-fitness-wellness

लहान मुलांना 'म्युकरमायकोसिस' होतो का?

शर्वरी जोशी

महाराष्ट्रात कोरोनाच्या (corona ) दुसऱ्या लाटेचा झालेला उद्रेक पाहून प्रत्येकजण हवालदिल झाला आहे. त्यातच आता कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (mucomycosis) हा गंभीर आजार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्युकरमायकोसिस (mucomycosis) हा बुरशी जंतूसंसर्ग आजार असून त्यामुळे अनेकदा मृत्यूदेखील ओढावला जाण्याची शक्यता आहे. परंतु, या आजाराविषयी नागरिकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. त्यातच हा आजार लहान मुलांना होतो की नाही याविषयीदेखील अनेक चर्चा सध्या रंगत आहेत. म्हणूनच पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ. अलकेश ओस्वाल यांनी या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली आहे. (mucomycosis corona infection children)

‘‘कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रूग्णांना ' म्युकरमायकोसिस ' हा दुर्मिळ जंतुसंसर्ग होतो. 'म्युकरमायकोसिस' हा आजार म्हणजे एक प्रकारे फंगल इन्फेक्शन आहे. ही बुरशी आपल्या आजूबाजूला आढळून येते. ही बुरशी आपल्या शरीरामध्ये नाकावाटे प्रवेश करते. आपल्या नाकामध्ये किंवा नाकावरच्या पोकळीत ही बुरशी राहते. परंतु, हे इंफेक्शन प्रत्येकालाच होते असं नाही.

पुढे ते म्हणतात, "ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे अशा लोकांना या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. याशिवाय मधुमेह, कर्करोग, हदय, यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांनाही हा संसर्ग होऊ शकतो. कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळेही रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि, त्यामुळे अशा रूग्णांना या बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.’’

म्युकरमायकोसिसची लक्षणे कोणती?

नाकातून रक्तस्त्राव होणे

डोळे लाल होणे

डोळ्यातून पाणी येणं

पापण्यांना सुज येणं

अंधत्व येणं

दात दुखणे

'म्युकरमायकोसिस'ची ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचं आहे. कारण हा आजार पटकन पसरतो. त्यामुळे या बुरशीचा संसर्ग नाकापासून जबड्यापर्यंत आणि डोळ्यांपासून मेंदूपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. डॉक्टरांना दाखवल्यानंतर पहिल्यांदा एमआरआय, सीटीस्कॅन किंवा एण्डोस्कोपीसारख्या चाचण्या करून या आजाराचे निदान केले जाते.

लहान मुलांना 'म्युकरमायकोसिस' होतो का?

करोनाबाधित लहान मुलांना भविष्यात या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी आहे. पण लहान मुलांमध्ये काही अन्य आजार असल्यास त्यांना हा त्रास होऊ शकतो. यासाठी पालकांनी मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्य आजारावर डॉक्टरांची वेळेवर औषध मुलांना देणं आवश्यक आहे. मुलांच्या प्रकृतीत काही बदल दिसून आल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. ’’

म्युकरमायकोसिसवरील उपचारपद्धती

‘‘शरीराच्या ज्या भागात बुरशीचा संसर्ग झालेला आहे, तो भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जातो. ही प्रक्रिया साधारणतः दुर्बिणीद्वारे केली जाते. याशिवाय रूग्णाला अँण्टी फंगल मेडिसिन सुरू करतो. या औषधांमुळे बुरशीचा प्रसार शरीरात होण्यापासून थांबवला जातो. अशा प्रकरणात रूग्णांना दर आठवड्यातून दाखवण्यासाठी बोलवलं जातं. वारंवार दुर्बिणीद्वारे चाचण्या करून रूग्णाच्या शरीरात आजाराचा प्रसार होतोय का याची खात्री करून घेतली जाते. या आजारातून बरे होण्यासाठी रूग्णाला दिड ते तीन महिने लागतात. या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणे १७ टक्क्यांवरून ५४ टक्क्यांपर्यंत आहे. हा आजार होऊ नये म्हणून साखरेचे सेवन कमी करावेत, नाकाची स्वच्छता राखावी, मास्क वापरणे गरजेचं आहे. याशिवाय या आजाराची कुठलीही लक्षणे आढळून आल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा’’, असेही डॉ. ओस्वाल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT