Shavasan
Shavasan Sakal
health-fitness-wellness

योग-जीवन : शवासन आणि फायदे

सकाळ वृत्तसेवा

आज पतंजली महामुनींनी लिहलेल्या ‘पातंजल योगदर्शन’ या महाग्रंथाची ओळख करून घेऊ या. पतंजलींनीं ही मानवाला दिलेली दैवी आणि मूल्यवान देणगी आहे.

- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक

आज पतंजली महामुनींनी लिहलेल्या ‘पातंजल योगदर्शन’ या महाग्रंथाची ओळख करून घेऊ या. पतंजलींनीं ही मानवाला दिलेली दैवी आणि मूल्यवान देणगी आहे. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या योगशास्त्र, त्या मागचे विचार आणि तत्त्वज्ञान एकत्रित करून त्याचा सार थोडक्यात, पण अचूक शब्दांत या ग्रंथामध्ये मांडला आहे. 

सात्त्विक, निरोगी, समृद्ध आणि सार्थक जीवनाचा मार्ग या छोट्या छोट्या १९६ प्रभावी सूत्रातून पतंजलींनी आपल्यापर्यंत पोहचविला आहे. ही सूत्रे ४ पादांत विभागली आहेत. बहुतेक सूत्रे एक किंवा अर्ध्या ओळीची असल्यामुळे थोडक्या शब्दांत गहन विषय मांडण्यात आला आहे. यांच्यावरचे विवेचन महर्षी व्यास यांनी केले आहे. त्या नंतर बऱ्याच विद्वानांनी व पंडितांनी मोठमोठ्या ग्रंथात आपापले विचार मांडले आहेत. अय्यंगार गुरुजींनी इंग्रजीत पातंजल योगसूत्रांवर चार वेगवेगळी पुस्तके लिहली आहेत. आजच्या योगाच्या नवीन पिढीसाठी गुरुजींनी ‘पातंजल योगसूत्रे प्रारंभिक ओळख’ हे पुस्तक मराठीत लिहिले आहे. ते जरूर वाचावे. 

पहिल्या पादाचे नाव आहे ‘समाधीपाद’. यात ५१ सूत्रे आहेत. ५५ सूत्रे असलेल्या दुसऱ्या पादाचे नाव आहे ‘साधनपाद’. तिसऱ्या पादा ‘विभूतीपाद’त आहेत ५६ सूत्रे. चौथ्या आणि शेवटच्या ‘कैवल्यपाद’त आहेत ३४ सूत्रे. 

आता वळूया आजच्या आसनाकडे. हे आहे शवासन. गुरुजी नेहमी म्हणायचे, हे सर्वांत सोपे वाटणारे आसन, सर्वांत अवघड आहे. १ मार्चच्या लेखात हे आपण शिकलो आहोत. तेच शवासन आज आपण लोड आणि ब्लॅंकेट वापरून करणार आहोत.

  • मॅटच्या टोकाला एक लोड लांबीमध्ये ठेवा. त्याच्या टोकावर ब्लॅंकेट दुमडून केलेली घडी ठेवा. लोडाकडे पाठ करून मॅटवर बसा. पाय गुडग्यात वाकलेले. गुडघे आकाशाकडे आणि पावले जमिनीवर ठेवा.

  • तळहात नितंबाशेजारी जमिनीवर ठेवा. कोपरे वाकवून पाठीचा कणा लांब करत हळूहळू लोडावर पाठ टेकवा. डोके किंचित उचलून ब्लॅंकेटची घडी खांद्यांना टेकवा आणि डोके त्यावर ठेवा.

  • हनुवटी छातीकडे कललेली असली पाहिजे. पायावर वजन घेत नितंब जरासे वर उचला. दोन्ही पंजे नितंबांच्या खाली सरकवून नितंबांचा मांसल भाग एकमेकांपासून लांब करीत टाचांकडे रेटत नितंब खाली जमिनीवर टेकवा.

  • एक एक पाय लांब करा व पाय फाकवून मॅटवर टेकवा. हात कोपऱ्यात वाकवून लांब करून घ्या. धडा पासून ३० अंश कोनात ठेवा. बगलेतून दंड आतून बाहेर फिरवून घ्या. खांद्यांची पाती लोडाला दोन्ही बाजूनी सारखी टेकलेली असली पाहिजेत. पोट लांब आणि छाती रुंद करून ठेवा, या स्थितीत श्‍वसन पटला वरचा ताण कमी होऊन श्‍वासोच्छ्वास सहज होतो.

  • पायाचे आणि पोटाचे सगळे स्नायू शिथिल सोडा आणि पावले सैल सोडून जमिनीकडे फिरवा. खांदे सैल सोडा. कपाळ, भुवया, गाल व चेहेऱ्याचे सगळे स्नायू सैल सोडा. पापण्या आणि ओठ हळुवार बंद करा. श्‍वासोच्छ्वास संथ लयीत चालू ठेवा. ५ ते १० मिनिटे थांबा. हे आहे शवासन.

  • पूर्ण लक्ष्य श्‍वासोश्‍वासावर केंद्रित करा. त्याचे नियंत्रण न करता, काय घडते आहे आणि काय होते आहे याचा अभ्यास करा. श्वास घेताना व सोडताना दोन्ही नाकपुड्यांतून एकसारखा व्हायला पाहिजे, दोन्ही फुफ्फुसे सारख्या प्रमाणात भरली पाहिजेत आणि पूर्ण रिकामी झाली पाहिजेत.

छाती कशी प्रसारण पावते, श्वसनपटल कसा उघडतो आणि आकुंचन पावतो याचा अनुभव घ्या. प्रत्येक वेळेस श्वास घेताना छाती रुंदावते, श्वास सोडताना ती तशीच राहिली पाहिजे. प्रत्येक वेळा श्वास सोडताना सगळे स्नायू शिथिल करा. श्वासोच्छ्वास आपोआप एका लयीत व्हायला लागेल. हृदयाची स्पंदने पण लयबद्ध होऊन डोके शांत होईल आणि मन प्रसन्न होईल. हे सगळे अनुभवताना चित्ताची विचलता कमी होते आणि एकाग्रता वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT