abc 
health-fitness-wellness

आता जिम जाण्याची गरजच नाही; घरच्या घरी हे ८ व्यायाम करा आणि राहा फिट 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: नेहमी फिट राहणं कोणाला आवडत नाही? आपलं लूक, बोलणं, चालणं, फिट दिसणं प्रत्येकाला आवडावं असा आपल्याला नेहमीच वाटतं. यासाठी अनेकजण जिमचा पर्याय निवडतात. भरमसाठ पैसे भरून जिम जॉईन करतात मात्र असं करून प्रत्येक जण फिट राहील असं नाही. जिममधील उपकरणांमुळे अनेकांना त्रास होतो. अनेकांच्या हातपायांवर सूज येते. त्यामुळे जिम सोडावी लागते.  मात्र आता चिंता करू नका. तुम्हाला घरच्या घरी फिट राहायचंय? मग आज आम्ही तुम्हाला घरीच करता येण्यासारखे काही कार्डिओ व्यायाम सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही चारचौघात उठून दिसाल यात शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया...

सूर्य नमस्कार 

सूर्य नमस्कारापेक्षा चांगला कुठलाच व्यायाम नाही हे आपण लहानपणीपासून ऐकत आलोय. यामुळे संपूर्ण शरीरात दिवसभर स्फूर्ती आणि शक्ती कायम राहते. सूर्य नमस्कारात एकूण १२ प्रकारची आसनं असतात. यामध्ये प्रणामासन, हस्तउत्तानासन, हस्तपादासन, अश्वसंचालासन, अधोमुखश्वानासन, अष्टांगनमस्कारासन, भुजंगासन ही आसनं सामील आहेत. त्यामुळे दररोज सकाळी उठून सूर्य नमस्कार करणे हा जगातलं सर्वोत्तम व्यायाम आहे. 

जम्पिंग जॅक

जम्पिंग जॅक म्हणजे उंच उड्या मारणे. हा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. तसंच शरीर योग्य त्या आकारात राहण्यास मदत होते. जम्पिंग जॅक करताना दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार जितकी उंच उडी मारता येईल तितकी उंच उडी मारा. उडी मारताना आपल्या पायांना दूर करा आणि आपले दोन्ही हात हवेत वर न्या. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा ज्यामुळे तुम्ही फिट राहाल. 

क्रॉस जॅक 

या व्यायामाद्वारे तुम्हाला तुमची बॉडी फिट ठेवण्यास मदत होईल. तसंच शरीरातील अधिकचं फॅट  कमी करण्यास मदत होते. हा व्यायाम करताना दोन्ही पायांमध्ये यानंतर ठेवा. नंतर उंच उडी मारा. ही उडी मारताना आपले हात कंबरेवर ठेवा. उडी मारल्यानंतर आपले पाय क्रॉस करून पुन्हा जमिनीवर आणा. यामुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. 

स्पॉट जॉग्स 

जॉगिंगबद्दल तुम्ही ऐकलंच असेल मात्र या व्यायामाला स्पॉट जॉग्स म्हणतात. यात तुम्हाला एका जागेवर उभे राहून जॉगिंग करा. म्हणजेच एका जगावर उभं राहून धावा. मात्र हा व्यायाम हळूहळू करा. हृदयाची गती जास्त वाढू देऊ नका. 

स्केटर स्क्वॅच

हा व्यायाम करताना सरळ उभे राहा आणि एका पायाला समोर नेऊन टोंगळ्यान्ना मोडून समोर न्या. जर तुम्ही उजवा पाय मागे नेला आहे तर डावा हात समोर आणा. हा व्यायाम दोन्ही पायांबरोबर १५-२० वेळा करा. ज्यामुळे तुम्ही फिट राहाल. 

स्किपींग 

स्किपींग तुम्ही लहानपणी नक्कीच केलं असेल. स्किपींग म्हणजेच दोरीवरच्या उड्या. यासाठी एक दोरी हातात घ्या तुमच्या शरीराला कुठेही स्पर्श होणार नाही अशाप्रकारे त्या दोरीवरून उड्या मारा. यामुळे तुमच्या शरीरातील फॅट नक्की बर्न होईल आणि तुम्ही फिट राहाल.  

जंप लॅन्ज 

आपल्या दोन्ही हाताच्या कोपरांना फोल्ड करत आपल्या कंबरेजवळ न्या. यानंतर उजवा पाय समोर न्या आणि कंबरेतून खाली वाका. यानंतर तुम्हाला जितकी उंच उडी मारता येईल तितकी उंच उडी मारा. यानंतर हीच क्रिया दुसऱ्या पाण्यासोबत चालू ठेवा. 

स्कॉच जंप 

कंबरेतून सरळ खाली वाका आणि हात सरळ समोरच्या दिशेनं पसरवा. यानंतर जितकी उंच मारता येईल तेवढी मारा. वर उडी मारताना आपले हात वर न्यायला विसरू नका. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करत राहा. यामुळे तुम्ही फिट राहाल. 

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT