menstruation. 
health-fitness-wellness

पीरियड्सच्या दरम्यान डोळ्यातून येताहेत रक्ताचे अश्रू; काय आहे हा दुर्मिळ आजार?

सकाळवृत्तसेवा

चंदीगढ : महिलांना महिन्याकाठी मासिक पाळी येते. वयात आल्यानंतर सुरु झालेली मासिक पाळी वयाच्या साधारण पन्नाशीरपर्यंत राहते. दर महिन्याला येणाऱ्या या मासिक पाळीच्या चार ते सात दिवसांच्या काळात महिलांमध्ये अनेक हार्मोनल चेंजेस होताना पहायला मिळतात. महिलांना पीरियड्सच्या दरम्यान तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, अंगदुखी आणि मंद भूक यांसारखे त्रास सोसावे लागतात. मात्र, तुम्ही कधी ऐकलंय का की पीरियड्सच्या दरम्यान एखाद्या महिलेच्या डोळ्यातून देखील रक्त येऊ शकतं? तुम्ही म्हणाल, असं कसं होऊ शकेल? हे काही शक्य नाहीये. मात्र, असं घडू शकतं. चंदीगढमधील एका महिलोसबत असा काहीसा प्रकार घडला होता. मात्र आता ती सुस्थितीत आहे. 

पीरियड्सच्या दरम्यान डोळ्यातून रक्त येण्याचे प्रकरण हे दुर्मिळ असून चंदीगढमध्ये जवळपास 5 वर्षांपूर्वी आढळलं होतं. पीरियड्सच्या दरम्यान डोळ्यातून रक्ताचे अश्रु येण्यासंबंधीचं प्रकरण ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. याला हेमोलेक्रिया ब्लडी टीअर्स नावाने देखील ओळखलं जातं. हा एक फारच दुर्मिळ आजार आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ही महिला जेंव्हा त्यांच्या जवळ आली तेंव्हा आधी तीला नाकातून रक्त येण्याची तक्रार होती मात्र नंतर तिच्या डोळ्यातून देखील रक्त येऊ लागलं. 

हेही वाचा - मूठभर दुर्वा पळवून लावेल मायग्रेन
हा अत्यंत दुर्मिळ परिस्थितीमधील 'ऑक्यूलर विकेरियस मेन्स्ट्रुएशन' (Ocular vicarious menstruation) आहे. महिलेच्या अनेक टेस्ट केल्यानंतर तपासात समजलं की हा आजार 'ऑक्यूलर विकेरियस मेन्स्ट्रुएशन' आहे. ज्यामुळे पीरियड्सच्या दरम्यान इतर अवयवांमधून देखील रक्तस्त्राव होऊ लागतो. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये छापून आलेल्या या स्टडी केसनुसार, या महिलेवर 3 महिने हार्मोनल ट्रिटमेंट केल्यानंतर ती बरी झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT