Pineapple 
health-fitness-wellness

अ.. अ.. अननस खूपच फायदेशीर! आरोग्यासाठी कमालीचे लाभदायक फळ

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : फळे खाणे शरीरासाठी आरोग्यदायी असते. त्या-त्या ऋतूमध्ये आलेली फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते घटक त्या-त्या वेळी पुरेशा प्रमाणात प्राप्त होतात. फणस, अननस यांसारखी फळे लोकांची लोकप्रिय फळे नसली तरीही ही फळे खाणे सर्वांत फायदेशीर मानले जाते. आपल्या शरीरासाठी अननस खुपच फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज अननसाचे सेवन करत असाल तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. तर जाणून घेऊया अननसाचे काय आहेत फायदे.

हेही वाचा - 'ब्लॅक कॉफी' हृदयाच्या समस्येवर रामबाण उपाय?, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे
1. अननसामध्ये विटामिन सीचे प्रमाण तब्बल 78.9 टक्के असते. अननस खाल्ल्याने शरीराचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो. शरीरावर झालेले घाव भरुन काढण्यास तसेच आयरनच्या कमतरतेमुळे झालेल्या आजारांना दूर करण्यासाठी अननस फायदेशीर ठरतो. 
2. अननस खाऊन वजन कमी केलं जाऊ शकतं. अननसमध्ये कॅलरीचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये विटामिन आणि खनिजे देखील असतात. 
3. अननसमध्ये ब्रोमेलॅन असतं. यामुळे एन्झाइमचं मिश्रण असतं. याचा वापर खासकरुन मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये पचनशक्तीला मजबूत करण्यासाठी म्हणून केला जातो. 

हेही वाचा - मद्य पिणाऱ्यांनो सावधान;मद्यात हे मिक्स करू नका, अन्यथा जावू शकतात तुमचे प्राण
4. अननसामध्ये मँगनीज असल्याने हाडांना मजबूत करण्यामध्ये त्याचा फायदा होतो. तसेच अननस ऑस्टियोपोरोसिसला स्थिर करण्यासाठी मदत करतो. 
5. अननसामध्ये रोगाशी लढणाऱ्या एँटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. अभ्यासानुसार, कँन्सरशी लढण्यासाठी याचा मोठा फायदा होतो.
6. अननस खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढतो. थंडीच्या दिवसांमध्ये याचं सेवन केलं पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT