Air Balance diet during pregnancy esakal
health-fitness-wellness

हिवाळ्यात गर्भवस्थेत हवा चौरस आहार, हलका व्यायाम

थंड आणि सुकी हवा यामुळे त्वचा आपले नैसर्गिक आर्द्रता आणि त्यातील तेल हरवून बसते.

प्रकाश सनपूरकर

थंड आणि सुकी हवा यामुळे त्वचा आपले नैसर्गिक आर्द्रता आणि त्यातील तेल हरवून बसते.

सोलापूर : हिवाळ्यात गर्भवती महिलांनी (Pregnant women) तिळ तेलाचे अभ्यंग, फळ, भाज्या व सुकमेवा या आहारासह स्वतःची प्रकृती स्थिर (Nature stable) ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. थंड आणि सुकी हवा यामुळे त्वचा आपले नैसर्गिक आर्द्रता (Natural humidity) आणि त्यातील तेल हरवून बसते. पोट वाढल्यावर सुद्धा त्वचेला तडे पडतात. यामुळे अनेक स्त्रियांना वेदना देखील होतात. याच कारणामुळे गरोदर स्त्रियांच्या पोटावर जास्त स्ट्रेच मार्क्‍स येतात. यापासून त्वचेचा बचाव करायचा असेल तर गरोदर महिलांनी त्वचेवर तिळ तेलाचे अभ्यंग वेळोवेळी करावे. यामुळे स्कीन हायड्रेट (Skin hydrate) राहते.

जास्त पाणी प्यायल्याने वारंवार झोपमोड करून लघुशंकेला जाणे, गरोदर स्त्रियांसाठी त्रासदायक असल्याने हिवाळ्यात गरोदर स्त्रिया (Pregnant women) कमी पाणी पितात. मात्र, ही एक मोठी चूक ठरू शकते. गरोदरपणात शरीराला जास्त पाणी लागते. जर गरोदरपणात डिहायड्रेशन (Dehydration) झाले तर बाळासाठी आवश्‍यक असणारे एम्निओटिक फ्लूइड (Amniotic fluid) कमी होऊ शकते. यामुळे मुदतपूर्व प्रसुतीचा धोका उद्‌भवतो. तसेच प्रसुतीनंतर अंगावरचे दूध सुद्धा कमी होऊ शकते. म्हणून गरोदर स्त्रियांनी हिवाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाण्यासोबतच फळ (Fruits) आणि भाज्यांचा ज्यूस (Vegetable juice)
सुद्धा प्यावा. थंडीत त्वचेतील छोट्या छोट्या रक्त वाहिन्यांमध्ये सूज निर्माण होऊ शकते. याशिवाय हात आणि पायांवर खाज लाल चट्टे, सूज व पुळ्यादेखील येऊ शकतात. तेव्हा पायांना चांगल्या प्रकारे झाकून ठेवा. कोमट पाण्यात पाय ठेवावेत.

फळे व भाज्यांचा आहार (A diet of fruits and vegetables)

गरोदरपणात संतुलित आहारात फळांचा समावेश (Including fruits)हवा. फळे आपल्या रोगप्रतिकार शक्तीला (Immunity) मजबूत ठेवण्याचे काम करतात. आवळ्याचा ज्यूस (Amla juice) हा मॉर्निंग सिकनेस (Morning Sickness), मळमळ, अपचन आणि गरोदरपणातील अन्य त्रासदायक समस्यांना कमी करण्यात मदत करू शकतो. पेरू आणि संत्री यासारखे फळ व काळे मनुके खावेत. जेणेकरून मलावष्टंभाचा त्रास होणार नाही. पालक, मेथी आणि कांद्याच्या पातीसारख्या भाज्यांचा समावेश असावा. सुका मेवा, खारीक, खोबरे घालून शुद्ध गाईचे तूपयुक्त लाडू करून खावे.

हे जरुर करा

- जेवणानंतर शतपावली करावी.

- अंगाला तेल व उटणे लावून गरम पाण्याने स्नान करावे

- आहारात दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ वापर करावा.

- उपवास करणे टाळा व रोज ताजे आणि सात्विक अन्नाचे सेवन करा.

- रोज वापरायचे कपडे स्वच्छ धुवून आणि सूर्यप्रकाशात कोरडे करूनच वापरावेत

- रोज सकाळच्या कोवळ्या उन्हाचे सेवन करावे

हे करू नका

- दीर्घकाळ खूप गरम कपडे घालणे

- दीर्घकाळ हात आणि पायात मोजे घालणे

- जंक फूड खाणे

- जास्त झोपणे

- घरात कपडे सुकवणे

- डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार औषधे घेणे

गर्भवती महिलांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार आहार विहाराचे नियोजन करणे उपयुक्त ठरते. हिवाळ्यात चांगली भूक लागत असल्याने योग्य आहार प्रकृती चांगली ठेवण्यास उपयोगी ठरते.

- प्रा. डॉ. वीणा जावळे, जैन आयुर्वेदिक महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT