Potato Benefits For Weight Loss 
health-fitness-wellness

बटाटा खाल्ल्यामुळे वजन होते कमी! कसे ते जाणून घ्या

'द पॉटेटो हॅक' : वॅट लॉस सिम्पलीफाईड' या पुस्तकात वजन कमी करण्यासाठी बटाटा कसा मदत करतो ते सांगितले आहे

सकाळ डिजिटल टीम

Potato Benefits For Weight Loss : बटाटा. सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी अत्यंत आवडीची भाजी (Vegetable) बटाट्यापासून असंख्य पदार्थ तयार होतात. फ्रेंच फ्राईस, आलू पराठा, उकडलेल्या बटाट्याची भाजी तर अनेकांच्या आवडीची. पण, वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बटाटा योग्य असल्याचं तुम्ही एेकलं आहे का? जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कुठला साधा पदार्थ (Food) शोधत असाल तर बटाटा हा उत्तम पर्याय आहे. बटाटे हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. तसेच ते कर्करोगासह इतर आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात . भरपूर ऊर्जा देणारी ही भाजी पचायला सोपी असते. त्यात केळ्यापेक्षा जास्त पोटॅशियम असते. तुम्हाला फिटनेस (Fitness) जपण्यासाठी बटाटा नक्कीच मदत करू शकतो. (Potato Benefits For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी बटाट्याचा फायदा (Potato Benefits For Weight Loss)

बटाटा हा वजन कमी करण्यासाठी, पचन आणि आरोग्य सुधारण्यासाठी योग्य म्हणून डिझाईन केला आहे, एका वैद्यकीय अहवालानुसार १८४९ साली बटाटा हा एका डॉक्टरने लठ्ठ आणि अपचन होणाऱ्या लोकांसाठी फायद्याचा असल्याचे म्हटले होते. काही लोकांना अपचनाची समस्या होती. टिम स्टीला यांनी त्यांच्या 'द पॉटेटो हॅक' : वॅट लॉस सिम्पलीफाईड' या पुस्तकात लोकांना वजन कमी करण्यासाठी बटाटा कसा मदत करतो ते सांगितले आहे. बटाटा हा आतापर्यंतचा सर्वोत्तम आहार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. बटाट्यामध्ये असणारी संयुगे जळजळ, भूक, इन्सुलिन आणि झोपेवर परिणाम करतात, 2014 साली झालेल्या अभ्यासात बटाट्यांसोबत किंवा त्याशिवाय कमी-कॅलरी आहार घेत असलेल्या लोकांच्या गटातील वजन कमी झाल्याची तुलना केली. तेव्हा असे आहारात बटाटे समाविष्ट केल्याने वजन वाढत नाही, असे आढळून आले.

डाएट करण्यापूर्वी हे वाचा

-डाएट करणाऱ्यांना 3ते 5 दिवस दररोज २ ते ५ पौंड बटाटे खाण्याचा सल्ला दिला जातो.

-बटाट्याबरोबर इतर कोणत्याही भाज्या एकत्र करून खाऊ नयेत.

-गरज असल्यास कमी प्रमाणात तुम्ही हिमालयीन गुलाबी मीठ वापरू शकता.

-तुम्ही काळा चहा, हर्बल टी, ब्लॅक कॉफी (दूध, साखर न घालता) आणि पाणी पिऊ शकता.

-जेव्हा तुम्ही बटाट्याचं डाएटिंग करणार असाल तेव्हा जड व्यायाम करू नका. त्यापेक्षा पायी चालण्याला महत्व द्या.

असे डाएट क-रण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT