drinking water at nite esakal
health-fitness-wellness

रात्री गरम पाणी पिण्याचे आहेत तीन फायदे! जाणून घ्या

सकाळीच गरम पाणी प्यायल्याने फायदा होतो असं नाही

सकाळ डिजिटल टीम

थंडीत अनेक लोकं सकाळी (Morning) उठल्यावर गरम पाणी पितात. आंघोळ करतानाही जास्त गरम पाणी वापरतात. गरम पाण्यामुळे (Hot Water) आपल्या शरीराला (Body) उष्णता मिळते. थंडीत (Winter) तर आपले शरीर शेकले जाते. पण या पाण्याचे अनेक फायदे आहेत. गरम पाणी तुम्ही सकाळीच प्यायला पाहिजे असे नाही. तर तुम्ही रात्रीही गरम पाणी पिऊ शकता. उलट रात्री झोपण्याआधी हे पाणी प्यायल्याने आपले शरीर डिटॉक्स अर्थात विषारी पदार्थांपासून दूर ठेवते. तसेच आपली प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते. महत्वाचे म्हणजे, रात्री गरम पाणी प्यायल्यानेही झोप चांगली लागते. रात्री गरम पाणी प्यायल्याने आणखी काय फायदे होतात, ते जाणून घेणे महत्वाचे आहे. (Hot Water Benefits at Night)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी काही लोकं सकाळी गरम पाणी पिण्याचा नियम करतात. पण रात्री गरम पाणी प्यायल्यानेही वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे गरम पाणी लठ्ठपणा तसेच कॉलेस्टरॉलची समस्या असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याचे ठरू शकते. (Hot Water Benefits at Night)

Sleeping

चांगली झोप आणि मानसिक आरोग्यासाठी फायदा

गरम पाणी प्यायल्यामुळे मानसिक उदासीनता कमी होते. डिप्रेशनची समस्या असेल तर खूप आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्यास झोपेची गुणवत्ता वाढून चांगली झोप लागते. म्हणूनच जर तुम्हाला तणाव जाणवत असेल किंवा झोपेबाबत अडचणी असतील तर गरम पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. (Hot Water Benefits at Night)

पचनक्रिया सुधारते

गरम पाणी प्यायल्याने अपचनाची तक्रार दूर होऊन पचनक्रिया सुधारते. गरम पाण्यामुळे अन्न पचण्यासाठी पोटात बाहेर पडणाऱ्या पाचक रसांचा स्राव वाढतो. पचनक्रिया बरोबर असेल तर गॅस किंवा अॅसिडिटीही होत नाही. याशिवाय गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्यामुळे पोटासंबंधी किंवा पचनसंस्थेशी संबंधित काही समस्या असल्यास गरम पाण्याचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो.(Hot Water Benefits at Night)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT