wfh 
health-fitness-wellness

कोरोना काळात 'वर्क फॉर्म होम'; मेंटल हेल्थसाठी वरदान की शाप? 

सकाळन्यूजनेटवर्क

कोरोना महामारीच्या संसर्गानंतर अनेकांचे जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांच्या पगारामध्ये 30 ते 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली. कोरोनामुळे अनेकांना वर्क फॉर्म होम करावे लागले. सुरुवातीला बरे वाटणारे वर्क फॉर्म होम नंतर नंतर तणावाचे ठरु लागले. कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करताना जास्तीचे काम करायला लावले. घरुन काम करणे लवचिक वाटत असले तरी कामासारखे वातावरण आजूबाजूला असणेही आवश्यक असते, ते नसेल घरुन काम करणे अडचणीचे ठरु शकते. 

एका सर्वेक्षणानुसार, 51 टक्के लोकांना घरुन काम करताना ताण, भीती, राग, डोकेदुखी आणि रात्री झोप न येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 66 टक्के लोकांना असं वाटतं की, घरी असताना ते कामावर जास्त फोकस देऊ शकत नाहीत. तसेच ऑफीसपेक्षा घरी काम करताना येथे जास्त प्रोडक्टिव काम दाखवू शकत नाहीत. शिवाय अनेकजण दिर्घकाळापासून तणावाखालून जात आहेत.

आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर दररोज नारळपाणी प्याच

घरुन काम करताना मल्टी टास्कींग कमी झाले आहे. अनेकांना आता सारख्याच सेटपमध्ये काम करावे लागले. 41 टक्के लोकांनी असं मत नोंदवले की ते घरुन काम करताना कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे इन्जॉय करत होते. तर, काहींना तेच तेच काम करणे रटाळवाणे वाटू लागले होते. अशातच अनेकांमध्ये चिडचिडपणा वाढला असल्याचं दिसून आलं. 

मेंटल हेल्थ कशी सुधाराल

- घरुन काम करताना घरच्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना कामात सहभागी करुन घ्या.
- सलग काम करणे टाळा. ब्रेक घेत रहा, तुमचे आवडते गाणे ऐका, हवंतर टेरेसवर थोडावेळ चाला.
- घरुन काम करत असताना सुट्टी कशाला घ्यावी, असं अनेकांना वाटतं. पण सुट्टीसाठी अप्लाय करा आणि काही दिवस आराम करा.
-मेंटल हेल्थप्रमाणे फिजिकल हेल्थ पण महत्वाची आहे. चांगले अन्न खा. सकाळी किमान अर्धा तास व्यायाम, योगासन करा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT