Sadguru
Sadguru 
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : आपण उत्सव का साजरे करतो?

सद्‌गुरू

भारतीय संस्कृतीत एक काळ असा होतास की वर्षाचा प्रत्येक दिवस हा सण असायचा - वर्षात 365 उत्सव - कारण उत्सव हे जीवनात उत्साह आणि आयुष्य उल्हासात जगण्याचे साधन आहे. आपली अवघी भारतीय संस्कृती उत्सवाच्या स्थितीत होती. आज नांगरणीचा दिवस असेल. तर हा एक प्रकारचा उत्सव होता. उद्या लागवडीचा दिवस, तर हा एक वेगळा उत्सव असायचा. परवा खुरपायचा दिवस होता, तर हा एक उत्सव होता. कापणी अर्थातच तो अजूनही एक उत्सव आहेच. पण गेल्या 400 किंवा 500 वर्षांत आपल्या देशात दारिद्र्य आले, आणि आपण प्रत्येक दिवस साजरा करू शकलो नाही.

आजकाल, दुर्दैवाने, सण म्हणजे ते तुम्हाला सुट्टी देतात आणि तुम्ही दुपारी उठता. मग तुम्ही खूप खाता आणि सिनेमाला जाता किंवा घरी टीव्ही बघत बसता. पूर्वी हे असे नव्हते. उत्सव म्हणजे संपूर्ण गाव एका ठिकाणी जमायचे आणि तिथे एक मोठा उत्सव भरायचा. उत्सवाचा अर्थ असा होता की, आपण पहाटे चार वाजता उठायचो आणि अतिशय सक्रियपणे, बऱ्याच गोष्टी घरात घडायच्या. लोकांमध्ये ही संस्कृती परत आणण्यासाठी ‘ईशा’मध्ये असे चार महत्त्वाचे सण साजरे केले जातात : पोंगल किंवा मकरसंक्रांती, महाशिवरात्र, दसरा आणि दिवाळी. आपण असे काही केले नाही, तर पुढची पिढी येईपर्यंत त्यांना उत्सव म्हणजे काय हेच कळणार नाही. ते फक्त खातील, झोपतील. हे सर्व पैलू भारतीय संस्कृतीत आणले गेले आहेत, ज्यायोगे एखाद्या माणसाला अनेक मार्गांनी सक्रिय आणि उत्साही ठेवता यावे यासाठी. यामागची कल्पना अशी  होती की आपले संपूर्ण आयुष्य एक निरंतर उत्सव बनावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक गोष्ट तुम्ही जणू एक सोहळा म्हणून कराल, तर तुम्ही जीवनाबद्दल गंभीर न राहाताही  त्यात पूर्णपणे समरस व्हायला शिकता. आत्ता बहुतेक लोकांबरोबर समस्या ही आहे, की जर त्यांना असे वाटले की काहीतरी महत्त्वाचे आहे, तर ते त्याबद्दल प्रचंडपणे  धीरगंभीर होतात. त्यांना असे वाटले की ते काही इतके महत्त्वाचे  नाही, तर ते त्याबद्दल ढिसाळ, बेजबाबदार होतात – आवश्यक तो सहभाग ते दाखवत नाहीत. तुम्हाला माहिती आहे, भारतात जेव्हा कोणी म्हणते, ‘‘तो खूप सिरियस आहे,’’ म्हणजे त्याचा पुढचा टप्पा तुम्हाला माहिती आहे कुठे आहे ते. बरेच लोक आज अशा सिरियस स्थितीत वावरताना दिसतात. आणि अशा लोकांच्या बाबतीत फक्त एकच महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे अस्तित्वातल्या अद्भूत गोष्टींना ते मुकतील, कारण त्यांना ज्या गोष्टी त्यांना गंभीर वाटत नाहीत, अशा कोणत्याही गोष्टीत परिपूर्ण सहभाग आणि समरसता दाखवण्यात ते असमर्थ आहेत. हीच मोठी समस्या आहे. जीवनाचे रहस्य हे प्रत्येक गोष्टीला गंभीर दृष्टीने न पाहता तरीही त्यात पूर्णपणे समरस होण्यात आहे – एका खेळासारखे. म्हणूनच जीवनातल्या सगळ्यात गहन पैलूंकडे आपण एक उत्सव सोहळा प्रमाणे पाहतो, जेणेकरून तुम्ही त्यातला सार चुकवणार नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT