Sadguru
Sadguru Sakal
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : समृद्ध मातीशिवाय आध्यात्म अशक्य

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

लोक मला नेहमी विचारतात असतात, ‘सद््गुरू, तुम्ही इतक्या सगळ्या श्रीमंत आणि लोकप्रिय व्यक्तींना का भेटत असता? तुम्ही झोपडपट्टीतल्या लोकांना का नाही भेटत?’

लोक मला नेहमी विचारतात असतात, ‘सद्गुरू, तुम्ही इतक्या सगळ्या श्रीमंत आणि लोकप्रिय व्यक्तींना का भेटत असता? तुम्ही झोपडपट्टीतल्या लोकांना का नाही भेटत?’ मी त्यांना म्हणतो, ‘मी इतका निर्लज्ज मनुष्य नाहीये की मी ज्या लोकांना रोजची भाकरी मिळण्यासाठी झगडावं लागतंय, त्यांच्याशी जाऊन मुक्तीविषयी बोलीन.’ कुठल्याही आध्यात्मिक प्रक्रियेसाठी, सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे आपण जिवंत राहिलो पाहिजे. पोटापाण्याची सोय होते, तेव्हा आपल्याला त्याचं विशेष वाटत नाही. पण जेव्हा त्याची सोय झालेली नसते, तेव्हा तेच सर्व काही असतं.

सर्व लोकांसाठी पोटापाण्याची सोय करणं सहज सुलभ नसल्यास आध्यात्मिक प्रक्रिया लोप पावेल. आध्यात्माचा दर्जा या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाला याचं कारण २००-३०० वर्षांचं दारिद्र्य. पण एकेकाळी, भारत एक संस्कृती म्हणून, हजारो वर्षांच्या आध्यात्मिक प्रक्रियेनं समृद्ध होता. याचं कारण आपल्याकडं आर्थिक स्थिरता आणि समृद्धी होती. म्हणून लोक स्वाभाविकपणे भौतिकाच्या पलीकडे, शरीर आणि मनाच्या पलीकडे शोध घेऊ लागले.

भौतिक पैलू पहिली पायरी

तुमचं शरीर आणि तुमचं मन तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये एकतर वर चढण्याची पायरी बनू शकतं किंवा अडथळा बनू शकतं. तुम्ही एका जागी बसलात आणि तुमचं शरीर इतक्या सहज अवस्थेत असलं की त्याच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीवही राहिली नाही, तर मग आध्यात्मिक प्रक्रिया तुमच्यासाठी एक शक्यता आहे. तुम्हाला शरीर आणि मनाला अशा प्रकारे अनुकूल बनवायचे असेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या शाररीक गरजांच्या पलीकडे पाहू शकाल, तर आवश्यक पोषण आणि तुम्हाला पोषित करणारी सेंद्रिय ऊर्जा तुमच्याभोवती असली पाहिजे, कारण जे शरीर तुम्ही वाहता ते सर्वस्वी तुमचे नाही. वेळ आलेली आहे आपल्याला हे समजण्याची, की आपण जे कोण आहोत ते म्हणजे मातीमध्ये घडत असलेल्या जीवनाचेच एक प्रतिबिंब आहे.

माती वाचवा चळवळ

दरवर्षी मातीमध्ये राहणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या साधारणपणे २७,००० प्रजाती नामशेष होत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या संघटना सांगत आहेत, की धरतीवर केवळ पुढच्या ८० ते १०० पिकांसाठी शेतजमीन शिल्लक आहे. याचा अर्थ पुढच्या ४५-६० वर्षांत आपल्याकडची माती संपून जाईल. जर तसे घडले, तर पृथ्वीवर भीषण अन्नटंचाई निर्माण होईल. म्हणून, ‘कॉन्शियस प्लॅनेट- माती वाचवा’ चळवळ ही आम्ही गेली चाळीस वर्षे करत असलेल्या आध्यात्मिक चळवळीपासून काही वेगळी नाही. मातीला पुनरुज्जीवित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. अद्याप न जन्मलेल्या पिढीचा विचार करण्याइतपत सर्वसमावेशक भाव असणं, हा अत्यंत आध्यात्मिक गुण आहे.

मला सर्व लोकांनी मातीबद्दल जाणून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा आहे. ही एक खूप गंभीर समस्या आहे, पण आपल्याकडे पुढच्या १०-१५ वर्षांत ही प्रक्रिया उलटवण्याची संधी आहे. यासाठी प्रत्येक राष्ट्राने मातीविषयक धोरण निर्माण केलं पाहिजे. ‘माती वाचवा’ चळवळ हेच करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सबंध जगभरातल्या ३.५ अब्ज नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, राजकीय पक्षांना आणि शासनांना माती पुनरुज्जीवित करण्यासाठीच्या दीर्घकालीन धोरणाची निर्मिती करण्यासाठी प्रेरित करता येईल. चला, आपण हे घडवून आणू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT