Healthy Food
Healthy Food Sakal
health-fitness-wellness

हेल्दी फूड : पीसीओएस आणि लो-कार्ब डाएट

शौमा मेनन

तुमच्या पैकी किती जणींचा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा (पीसीओएस) त्रास आहे, असा प्रश्न विचारल्यावर अनेक महिला आपला हात वर करतात. पीसीओएस हा महिलांमध्ये कायम आढळणारा एण्डोक्राइन डिसऑर्डरचा आजार असून, त्यामुळे महिलांना गरोदर राहण्यात अडचणी निर्माण होतात, तसे वजन खूप वाढणे, हायपरइन्शुलेनेमिया आणि इन्शुलिनला प्रतिकारासारखे आजार दिसून येतात.

लो-कार्ब प्लॅनचे परिणाम

अतिवजन, टाइप २ प्रकारचा मधुमेह, गर्भधारणेदरम्यान झालेला मधुमेह आणि इन्शुलिनला प्रतिकाराच्या इतर परिस्थिती निर्माण झालेल्या महिलांमध्ये पीसीओसी अधिक प्रमाणात आढळून येतो. हायपरटेन्शन (अतिताण) आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेल्या असल्यासही हा आजार होऊ शकतो. लो-कार्ब अन्न ग्रहण केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, इन्शुलिनची पातळी खाली येते व इन्शुलिनचा प्रतिकार कमी होण्याची स्थिती उलट होते. त्यामुळे हा उपचार खूप परिणामकारक व अधिक काळ टिकणारा ठरतो. त्यामुळे पीसीओएसचे उपचार करताना लो-कार्ब डाएटचा पर्याय निवडणे फायद्याचे ठरू शकते. लो-कार्ब डाएट सुरू केल्यास अनेक महिलांमधील पीसीओएसची लक्षणे कमी झाल्याची उदाहरणे आहेत व काही महिलांनी लो-कार्ब डाएट सुरू केल्यानंतर त्या लगेचच गरोदर राहिल्याचीही उदाहरणे आढळली आहेत. अनेक हे अगदी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे होताना दिसते. अर्थात, ही कोणतीही जादू नाही, मात्र हा उपचार खूपच परिणामकारक आहे, हे नक्की. हे उपचार सुरू केल्यानंतर वजन कमी करण्यास मदत होते, इन्शुलिनचे प्रमाण घटते हे आपण पाहिलेच आहे. यातून हार्मोनल सिस्टिममधील समतोल साधला जातो. यातून बीजकोश फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया सुरू होते व मासिक पाळीही सामान्य होते.

काय खावे?

  • लीन प्रोटिन

  • पोषक फॅट्स

  • साखरेचे (कार्ब) प्रमाण कमी असलेले बोरासारखी लहान बी असलेली फळे

  • स्टार्चचे प्रमाण कमी असलेल्या भाज्या

काय खाऊ नये?

  • धान्य

  • साखर

  • ग्लुटेन

  • दुग्धजन्य पदार्थ

पीसीओएसची समस्या असलेल्या महिलांसाठी या टिप्स उपयोग पडतील, ही अपेक्षा तुमच्या प्रकृतीला मानवेल असा लो-कार्ब प्लॅन निवडा आणि सुदृढ आयुष्य जगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT