Healthy Food Sakal
health-fitness-wellness

हेल्दी फूड : कार्बोहायड्रेट्स - कधी व किती!

नमस्कार वाचकहो, तुम्हाला जगात सध्या गाजत असलेले डेल्टा आणि अल्फासारखे शब्द चिंतेत टाकत नसतील, ही अपेक्षा!

शौमा मेनन

नमस्कार वाचकहो, तुम्हाला जगात सध्या गाजत असलेले डेल्टा आणि अल्फासारखे शब्द चिंतेत टाकत नसतील, ही अपेक्षा! आज आपण पुन्हा एकदा अत्यंत संवेदनशील अशा कार्बोहायड्रेट्स याचा विषयाबद्दल बोलणार आहोत. हा शब्द आपल्या पैकी अनेकांना चिंतेत टाकतो. हा जगातील सर्वाधिक शिव्या खाणारा शब्द ठरावा! कोणत्याही ‘हाय कार्ब’ वस्तू तिरस्करणीय ठरतात. ही गुंतागुंत सोडवण्यासाठी व चांगले कार्ब म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या शरीराला कोणत्या प्रकारच्या कार्बोहायड्रेट्सची गरज असते व त्याने स्नायू कसे बळकट होतात व तुम्ही दिवसभर तुमचे काम न थकता कसे करू शकता, हे पाहू.

पहिला प्रकार

काउच पोटॅटो

या प्रकारचे लोक कधीच, कोणत्याही प्रकारचा व्यायाम करीत नाहीत. स्वतःच्या कुत्र्यालाही आठवड्यातून एखादाच दिवस बाहेर फिरायला नेतात! घरापासून इमारतीच्या मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठीही कारचा वापर करतात. मोकळा वेळ मिळाला, की लगेचच कोचवर अंग टाकून देत आराम करतात. तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे - तुम्हाला अगदी कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्सची गरज आहे.

स्रोत - हिरव्या भाज्या, टोमॅटो, काकडी, दोडका, ब्रोकोली, फ्लॉवर, लालसर रंगाच्या व इतर कमी प्रमाणात कार्ब असलेल्या भाज्या.

दुसरा प्रकार

थोडे धावणारे, झुंबा डान्सर

हा व्यायामाचा अगदीच हलका प्रकार आहे. मात्र, तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करता, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही खर्च केलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी तुम्हाला कार्बोहायड्रेट्सची गरज नक्कीच आहे, मात्र विपुल प्रमाणात नाही! झुंबाच्या एका सेशनमधून तुम्ही जेमतेम ३०० ते ३५० कॅलरी जाळता.

स्रोत - रताळे, बटाटे, सब्जाच्या बिया, गाजर, हिरव्या भाज्या, टोमॅटो, काकडी, दोडका, ब्रोकोली, फ्लॉवर, लालसर व इतर सर्वच भाज्या खायच्या असल्यास भाजून, वाफवून किंवा थोड्या तेलावर परतून घ्याव्यात.

तिसरा प्रकार

वजन उचलण्याचे व्यायाम करणारे व नियमित धावणारे

छान, तुमचे अभिनंदन व आम्हाला तुमच्यासारख्या लोकांचा अभिमान वाटतो! तुम्ही तुमचे स्नायू बळकट बनविण्यासाठी व व्यायामात खर्च केलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहारात घेणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी चांगली बातमी, म्हणजे तुम्ही आठवड्यातून एकदा ‘चीट मील’ घेऊ शकता, म्हणजेच हवे ते खाऊ शकता. ताकद मिळवण्यासाठी खालील पदार्थ नक्की घ्या.

स्रोत - राजगिरा, ओट्स, सर्व प्रकारच्या भाज्या, अल्प प्रमाणात फळे, दिवसातून एकदा कडधान्ये, बिया आणि शेंगादाणे.

वरील सर्व गटांसाठी कार्बोहायड्रेट्सचे घातक स्रोत कोणते, हेही जाणून घ्या. मैदा, गहू, ब्रेड, तळलेले व प्रक्रिया केलेले अन्न.

या माहितीची तुम्हाला नक्की उपयोग होईल, या अपेक्षेसह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT