शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा
health-fitness-wellness

कॅल्शिअमच्या गोळ्या ऐवजी खा शेवग्याच्या शेंगा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : एका बाजूला कॅलशिअमची कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. त्यासाठी समुद्रातील शिंपल्यांचे कॅल्शिअम दळून तयार केले जाते. त्याच्या महागड्या गोळ्या खाऊन नागरिक किडणी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. जनावरांचे कॅल्शिअम कमी झाल्याने आरोग्याच्या समस्याही वाढलेल्या आहेत. अशा स्थितीत कॅल्शिअमच्या गोळ्यांऐवजी शेवग्याच्या शेंगा खाणे कधीही उपयुक्त ठरू शकते.

दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडत आहेत. आज बाजारात शेतकरी दोन ते पाच रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक ते खरेदी करण्यासाठी नाक मुरडत आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर पुढे शेवग्याचे पीक घेणे थांबवतील. मग हाच शेवगा इसराईलमधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने येईल व तेव्हा तो रांगा लावून घ्यावा लागेल.

एक्स्पोर्टचे कारण

भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण शेवगा उत्पादन घेतले. मात्र, उत्पादन चार पट झाल्याने भाव कोसळले. दुसरीकडे पाश्च्यात्य देशात जंक-फूडमुळे हाडांचे विकार वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच होताना दिसत आहे. हाडांचे झिजणे, कॅलशिअची कमतरता रोखण्यासाठी तेथे शेवग्याचा वापर सुरू झाला आहे. मात्र, भारतात याचा उलट स्थिती आहे.

हे आहेत गुण

  • गाजराच्या दहापट ‘अ’ जीवनसत्त्व

  • दुधाच्या १७ पट कॅल्शिअम

  • केळ्यांच्या १५ पट पोट्याशिअम

  • पालकाच्या २५ पट लोह

  • दह्याच्या ९ पट प्रोटीन

शेवग्याचे उपयोग कसा करावा

  • शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्या

  • सूप तयार करा

  • आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा शेवगा आहारात घ्या

  • शेवग्याची भाजी करा

  • सरबत करून द्या

  • शेवग्याची चटणी

  • शेवगा सूप

  • शेवग्याचे पराठे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT