health-fitness-wellness

Video : घरबसल्या पाच फिटनेस टेस्ट

श्रुती जहागिरदार

‘फिटनेस’हा आजकाल बऱ्याचदा वापरला जाणाऱ्या शब्दांपैकी एक आहे. आपण हा शब्द ऐकतो, मात्र आपला मेंदू काही महत्त्वाच्या नोंदी करीत नाही. फिट राहण्याबद्दल केवळ वाचून आपण असे किती शिकू शकतो?

आपण आपला फिटनेस स्वतः तपासू शकत नाही आणि वाचलेल्या गोष्टी आचरणात आणत नाही, तोपर्यंत वाचन केवळ माहिती मिळवण्याता एक भाग आहे. त्यामुळे या पहिल्या भागात आपण स्वतः तपासून पाहणार आहोत, की महत्त्वाच्या पाच फिटनेस घटकांनुसार आपण किती फिट आहोत.



या चाचण्या स्वतः करा
१. कार्डिओव्हेस्क्युलकर एन्डुअरन्स - सलग एका मिनिटासाठी high-knees हा व्यायाम करा.

२. मस्क्युलर स्ट्रेंथ - १० पुशअप्स किंवा १५ स्क्वॅट्स पूर्ण रेंजसह करा.

३. फ्लेक्सिबिलिटी - पायाच्या बोटांना गुडघे न वाकवता स्पर्श करा आणि १५ सेकंद थांबा.

४. बॉडी कॉम्पोझिशन - शरीरावर भरपूर लूज फॅट टिश्‍यू असल्यास तुमचे फॅटचे प्रमाण अधिक आहे. उदा. पोटावर, पाठीवर, मांडीवर किंवा हातावर चरबी असल्याचे आपल्याला सहजपणे दिसून येईल.

५. झोप व पोट साफ होणे - तुम्हाला रात्री सहज झोप लागते का आणि ती दररोज सहा ते आठ होते का, हे तपासा. पोट रोज साफ होते का, हेही तपासा.

(वरील व्यायाम कसे करायचे हे महिती नसल्यास यू-ट्यूबवर शोधू शकता.)

या चाचण्यांद्वारे आपण आपला सुयोग्य फिटनेस प्रोग्रॅम निवडण्यासाठीचा तर्कशुद्ध मार्ग वापरला आहे. तो कोणताही विचार न करता फॉलो केलेल्या फिटनेस प्रोग्रॅमपेक्षा किंवा सोशल मीडियावरून निवडलेल्या प्रोग्रॅमपेक्षा अधिक शास्त्रसुद्ध आहे, हे नक्की. या पद्धतीने चाचण्या केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फिटनेस प्रशिक्षकाला स्पष्टपणे सांगता येईल, ती त्याच्याकडून तुमच्या नक्की काय अपेक्षा आहेत.

वरील पाच चाचण्यांपैकी एखादीमध्ये तुम्ही कमी पडला असाल, तरी त्या घटकावर अधिक भर देऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही फिटनेसची पातळी गाठली असली, तरी हा फिटनेस तुमच्याबरोबर कायम राहील, असे नाही. तुम्ही शरीराची काळजी घेणे सोडल्यास फिटनेसही तुम्हाला सोडून जाईल. फिटनेसच्या वरील चाचण्या ज्यांना सोप्या वाटल्या, त्यांनी आपल्या शरीराला आणखी मोठे आव्हान देऊन अधिक फिट होण्याचा प्रयत्न करावा.

अलिबाबा कंपनीचे संस्थापक जॅक मा म्हणता, ‘‘तुम्ही लोकांपुढे आरोग्य व पैसे ठेवल्यास लोक पैसे घ्यायला लगेच तयार होतील. त्यांना हे कळत नाही, की आरोग्य सोबत असल्यास पैसा आणि आनंद हे दोन्ही कमावता येते.’’

आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय निवडायचे आहे...

(लेखिका राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉलपटू, प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि स्पोर्ट्स न्युट्रिशिअन आहेत. त्या हालोमीफिटनेस (www.halomifitness.com) या स्टार्टअपच्या संस्थापक सीईओ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT