TEA LOVER
TEA LOVER 
health-fitness-wellness

'चाय लव्हर' आहात? चहाच्या साईड इफेक्ट्सविषयी आधी हे वाचा

सकाळवृत्तसेवा

वाफाळत्या गरमागरम अशा चहाचे तुम्ही दिवाने असालच! दिवसाची सुरवातच एका मस्त चहाने होत असेल. दिवसभरातही अध्येमध्ये चहाचा आस्वाद घेऊन तुम्ही तुमचा कंटाळा आणि मूड ठिक करत असाल. मात्र, हाच चहा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतो. हो, हे खरंय! मर्यादीत चहा पिल्याने तुमचा थकवा, डोकेदुखी, आळस आणि कंटाळा दूर होऊ शकतो. मात्र अधिक चहा पिल्याने तुम्ही अनेक गंभीर अशा आजारांच्या तावडीत सापडू शकता.  चहामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफीन आणि टॅनिनसारखे घटक असतात जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे चहा किती प्रमाणात पिला पाहिजे तसेच त्याहून अधिक चहा पिणे कसे नुकसानकारक ठरू शकते याबाबतच आपण माहिती घेणार आहोत. 

हेही वाचा - वारंवार लघुशंका येत असल्यास ती आहेत गंभीर आजाराची लक्षणे
एका दिवसात किती कप प्यावा चहा
भारतीय लोकांना चहाची तलप मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, एका दिवसात जास्तीतजास्त 2 ते 3 कप चहा आपल्यासाठी योग्य असतो. एक कप चहामध्ये जवळपास 20 ते 60 ग्रॅम कॅफिनचे प्रमाण सापडतं, जे आपल्या चहाच्या कपाच्या आकारावर अवलंबून असतं. अशावेळी कॅफीन अधिक प्रमाणात आपल्या शरीरात जाणे आपल्यासाठी घातक ठरू शकतं. 

आयरन आणि प्रोटीनवर परिणाम
चहामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन प्राप्त होतं. त्यामुळे शरीरात आयरन आणि प्रोटीन शोषून घेण्याची क्षमता कमी होते. म्हणूनच अधिक प्रमाणात चहाचे सेवन करणे टाळले पाहिजे. दिवसभरात दोन-तीन कप चहा आपल्यासाठी अधिक असतो.

एँटीबायोटीक्स औषधांचा परिमाम होतो कमी
चहा एँटीबायोटीक्स औषधांचा परिणाम कमी करतो. एका रिपोर्टनुसार, चहा केमोथेरपी, क्लोजापाइन औषधांचा परिणाम कमी करतो.जर आपण एँटीबायोटीक्स औषधांचे सेवन करत असाल तर आपण चहाचे सेवन करणे टाळले पाहिजे. 

पोटाचे विकार
अधिक प्रमाणात चहाचे सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते तसेच ऍसिडीटी, पोटात जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दिवसातून दोन-तीन वेळा चहा घेतल्यानंतर अधिक चहा घेऊ नये. 

गर्भपाताचा धोका
गर्भावस्थेच्या दरम्यान चहाचे सेवन महिलांसाठी हानीकारक ठरू शकते. कॅफीनच्या अधिक प्रमाणामुळे पोटातील गर्भाला धोका असू शकतो. यामुळे गर्भपाताचा देखील धोका असतो. त्यामुळे गर्भावस्थेदरम्यान चहाचे अधिक सेवन टाळा. 

चक्कर येणे
अधिक प्रमाणात चहा पिल्याने चक्कर येणे, यांसारखी समस्या येऊ शकते. चहामधील कॅफीनमुळे ही समस्या येऊ शकते. शरीरामध्ये कमकुवतपणा येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT