Side Effects of Refrigerated Eggs esakal
health-fitness-wellness

Side Effects Of Refrigerated Eggs : फ्रीजमध्ये अंडी ठेवणं ठरू शकतं धोक्याचं; वेळीच सावध व्हा!

अनेक लोकं आठवड्याभराची अंडी आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात.

सकाळ डिजिटल टीम

अनेक लोकं आठवड्याभराची अंडी आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात.

अनेकांच्या घरी रोज अंडी किंवा अंड्याचे पदार्थ बनवून खाल्ले जातात. अंड शरीरासाठी खूप चांगलं असतं, पण रोज-रोज दुकानातून अंडी आणण्यापेक्षा लोकं थेट आठवड्याभराची अंडी एकदम आणून ठेवतात. बरं, ती बाहेर ठेवली तर स्टोअर करता येतील असं नाही त्यामुळं त्यांना ठेवण्याची उत्तम जगा म्हणजे फ्रिज.

अनेक लोकं आठवड्याभराची अंडी आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात. नाशवंत वस्तू लवकर खराब होतात आणि त्यांना स्टोअर करण्यासाठी आपल्याला लहानपणा पासूनच एकच वस्तू माहिती आहे ती म्हणजे फ्रिज. भाज्या, मासे अंडी, बटर अशा अनेक गोष्टी आपण फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. अंडी फ्रिजमध्ये ठेवणं खरंतर बरोबर नाही. अंडी फ्रिजमध्ये ठेवले तर त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात.

अंड्यांतील पोषक तत्त्वं कमी होतात

अंडी खाणं अरोग्यासाठी कितीही चांगलं असलं, तरीही ती फ्रिजमध्ये ठेवली तर त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्वं कमी होतात. ज्यामुळं अंड्यांचं सेवन करुनही त्यापासून मिळणारे पोषक घटक शरीराला मिळत नाहीत.

अंडी संक्रमित होतात

फ्रिजमध्ये ठेवलेली आणि सर्वसामान्य तापमानावर ठेवलेली अंडी चवीला वेगवेगळी लागतात. बऱ्याचदा जुन्या अंड्यांतून वासही येऊ लागतो. फ्रिजमध्ये अंडी ठेवल्यास ती सहजपणे संक्रमित होऊन इतर गोष्टींचंही त्यामुळं नुकसान होतं.

बॅक्टरिया वाढू शकतात

अंडी फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीनं ठेवली तर त्यांच्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया वाढतो. ज्यामुळं आरोग्याला हानी पोहोचते.

उकडताना अंडी फुटतात

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळं ती कमकुवत होतात. उकडताक्षणी पटकन तुटतात. त्या तुलनेनं सर्वसामान्य तापमानावर ठेवलेल्या अंड्यासोबत असं होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT