health-fitness-wellness

स्त्रियांमध्ये निर्माण होतीये एण्डोमेट्रिओसिसची समस्या

महिलांनो, आरोग्य सांभाळा; एण्डोमेट्रिओसिस आजाराच्या प्रमाणात वाढ

मिलींद तांबे

मुंबई : कोरोना काळात महिलांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता महिलांशी संबंधित एण्डोमेट्रिओसिस endometriosis या आजाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या आजारावर वेळीच उपचाप न झाल्यास पुढे त्याच गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या आजारावर वेळी उपचार घेणं गरजेचं आहे, असं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (signs-and-symptoms-of-endometriosis-disease-in-women)

मागील काही दिवसांपासून महिलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत आहेत. त्यात आता एण्डोमेट्रिओसिस आजाराची भर पडली आहे. गर्भाशयाच्या अस्तराच्या भागाला एण्डोमेट्रिअम म्हणतात. "गर्भाशयाच्या अस्तरावरील ऊतीप्रमाणेच अन्य एक ऊती गर्भाशयाच्या पोकळी बाहेरपर्यंत वाढू लागते. परंतु, त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही", असे रोबोटिक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अभिषेक मंगेशीकर यांनी सांगितले.

काय आहेत एण्डोमेट्रोओसिसची लक्षणे?

मासिक पाळीदरम्यान वेदना होणे

वेदनादायक लैंगिक संबंध

बद्धकोष्ठता

हालचाल मंदावणे

सूज येणं

पाठदुखी, हात-पाय दुखणं

लघवी करताना वेदना जाणवणं

गुदाशयातून रक्तस्त्राव होणं

दरम्यान, एण्डोमेट्रोओसिस हा आजार सामान्य असल्याने महिलांना याबद्दल पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे. कारण वेळीच लक्ष न दिल्यास मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना जाणवू शकते. कोरोना काळातील मागील नऊ महिन्यात एंडोमेट्रिओसिस आजाराने त्रस्त असलेले शेकडो रुग्ण पाहिले आहेत. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 10 महिला रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहे. "कोरोना काळात केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने एंडोमेट्रिओसिस आजाराने पीडित 56 रूग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. सुमारे 25 टक्के प्रकरणे प्रजनन समस्येमुळे होती. तर 90 टक्के हून अधिक वेदनेमुळे त्रस्त आहेत",असे ही डॉ. मंगेशीकर यांनी पुढे सांगितले.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT