health-fitness-wellness

Sinus Infection: हिवाळ्यात ही 3 लक्षणे असू शकतात सायनसची

सकाळ डिजिटल टीम

  • थंड हवेमध्ये सायनसचा त्रास वाढू शकतो

  • हिवाळ्यात पाळीव प्राण्यांपासू दूर राहणे फायदेशीर

जर खोकला-सर्दीचा त्रासासह डोकेदुखी, फेशिअल फ्रेशर आणि बंद नाक अशी लक्षणे काही आठवडे सतत होत असेल तर त्वरित डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे. ही सायनस इनफेक्शनची लक्षण आहे. खोकला-सर्दी आणि अलर्जी व्यतिरिक्त थंड हवा देखील सायनसची समस्या वाढवू शकते. हवेसोबत धूळीचे सुक्ष्म कण आपल्या सायनसमध्ये प्रेवेश करू शकतात आणि सूज वाढू शकते.

अशावेळी तुमचे पाळीव प्राणी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. प्राण्यांच्या केसांमधील कोंडा सायनसचे इन्फ्लेमेशनचे कारण ठरू शकते. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात अल्कोहलचे नियंत्रित सेवनाने साईनसचा धोका कमी करता येऊ शकतो. सायनसची समस्या वायरसमुळे होते पण, काही बाबतीत बॅक्टेरिया आणि बुरशी देखील त्याचे कारण असू शकते. वायरल इन्फेक्शनच्या बाबतीत तुम्ही दुसऱ्यांना देखील संक्रमित करू शकता.

सायनस इन्फेक्शनचे लक्षण

सायनसचे इनफेक्शनमध्ये नाक वाहण्याची समस्या पाहायला मिळते. त्याशिवाय डोकेदुखी, बंद नाक किंवा चेहाऱ्यावर वेदना जाणवणे, अशी लक्षण सतत दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्षित केल्यास त्रास वाढू शकतो.

कशी घ्याल काळजी?

थंडीमध्ये सायनस इन्फेक्शनपासून सुरक्षित राहण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. जेवणा आधी आणि नंतर हाथ व्यवस्थित धूवा जेणेकरून बाहेरील किटाणु तोंडावाटे शरीरात प्रवेश करू शकणार नाही. घरामध्ये वापरलेले कार्पेट बदला आणि उशी, चादर, सोफा, फर्नीचरवर बसलेली धूळी चांगल्या प्रकारे साफ करा. जानवरांच्या केसातील कोंड्यापासून संपर्क टाळा. तसेच डॉक्टरचा सल्ला घेऊन नियमित वाफ घ्या. थंडीच्या दिवसामध्ये पुरेसे पाणी प्या ज्यामुळे सायनस डाय होणार नाही. त्याशिवास तोंडाला व्यवस्थित मास्क लावून झाका. प्रदुषण किंवा अॅलर्जीपासून लांब राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT