sri sri ravi shankar
sri sri ravi shankar Sakal
health-fitness-wellness

चेतना तरंग : वरवरचे आभार...

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

श्री श्री : आभार कसे मानावे? वरवर की तीव्र आणि खोल?

श्री श्री : आभार कसे मानावे? वरवर की तीव्र आणि खोल?

सगळे जण एका आवाजात : तीव्र आणि खोल!

श्री श्री : नाही. धन्यवाद वरवरचे असावेत. (सगळे संभ्रमात!) आभार मानण्यासाठी विभक्त होणे गरजेचे असते. आभार मानतोय, म्हणजे दोघे जण अलग आहोत. तुम्ही खोल अंतःकरणातून आभार मानत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही ही विभक्ती आतून पाहात आणि मानत आहात! खोल अंतःकरणात तर आभार मानण्याची गरजच नसते. कारण आपण सर्व एकच, एकतत्व आहोत. पण तुम्ही एक रीत म्हणून वरवर आभार मानू शकाल. धन्यवाद हे पाण्याच्या पृष्ठभागावर उठलेल्या तरंगासारखे असावे.

‘धन्यवाद’ असे म्हणून तुम्ही एक व्यवहार पूर्ण करता किंवा एक प्रक्रिया, एक संबंध पूर्ण कराल. ‘धन्यवाद’ हे ‘परत भेटू, निघतो’सारखे आहेत. असे सर्व व्यवहार तुम्ही वरकरणी, पृष्ठभागावरच पूर्ण करू शकाल. पण खोल अंतरात केवळ एकात्म आहे.

आभाराची भावना ही नेहमी दुसऱ्या कुणाबद्दल असते.

तुम्ही कारण नसताना, उगाच आभार मानत नाही. काही ना काही कारणासाठी तुम्ही आभार मानता. पण इथे अशा प्रसंगी हे ‘काही’ कारण ‘विनाकारण’ पेक्षाही निकृष्ठ ठरते!

खोल अंतःकरणाच्या पातळीवर आभार प्रदर्शनाला काहीही अर्थ नसतो. आपला एक हात कधी दुसऱ्या हाताचे आभार मानतो का? तुम्ही जेवढे खोल जाल, तसे तुमच्या ध्यानात येईल की ज्याचे आभार मानावे, असे ‘दुसरे’ तर कुणीच नाही.

जॉन : मग आपण वरवरचे आभार मानावे आणि खोलवर संवेदना जाणावी?

श्री श्री : संवेदनादेखील पृष्ठभागावर असते. संवेदना वा भावना जी जाणवते, तीच खरी अंतःकरणाची खोली असावी, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कधी पुरते खोल गेलाच नाहीत. तशी भावना-संवेदना ही विचारांपेक्षा खोल निश्चित असते, पण भावनासुद्धा बदलतात. जे खोल अंतःकरणात आहे, ते मात्र कधीही बदलत नाही.

म्हणून धन्यवाद वरवरचे माना, खोलातून नको. खोलवरचे आभार मानणे म्हणजे खोल विभक्ती मानणे!

स्टीव्ह : कदाचित आपण असे म्हणावे, ‘मी माझ्या जिभेच्या टोकावरून तुझे आभार मानतो!’ (हशा)

सद्गुरू सान्निध्याचे फायदे...

ज्ञान वृद्धिंगत होते.

दुःख नाहीसे होते.

कारण नसताना आनंदाचे उमाळे येतात.

कमतरता नष्ट होते आणि संपन्नता वाढू लागते.

सर्व कौशल्ये फुलून येतात.

तुम्ही तुमच्या सद्गुरूशी जितके जोडलेले असाल, त्यानुसार हे सर्व गुण विकसित होऊ लागतात. डोळे बंद करून थोडा वेळ बसा आणि तुमच्या गुरूशी जोडणारा जो धागा आहे, त्याची जाणीव जागृत करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT