4774344sean
health-fitness-wellness

आता कॅन्सरच्या उपचारानंतर चेहरा होणार नाही विद्रूप; तरुणाने तयार केले सर्जिकल गाइड

- राजेश प्रायकर

नागपूर : तोंडाच्या कॅन्सरवर (Mouth Cancer) उपचारादरम्यान त्रुटी राहिल्यास तोंड वाकडे होणे, बोलताना त्रास होण्याच्या व्याधी जडल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत. परंतु आता शस्त्रक्रिया (Operation on Cancer) अचूक होईल, असे थ्रीडी प्रिंटिंगचा वापर करीत सर्जिकल गाइड डिव्हाईस (उपकरण) नागपूरच्या संदीप डहाके या तरुणाने तयार केले आहे. या उपकरणामुळे आता चेहरा विद्रूप होणार नाही. (Student from Nagpur made Surgical guide device for cancer patients)

संजय डहाके यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग केले असून बायोमेडिकल मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये व्हीएनआयटीचे प्राध्यापक अभयकुमार कुथे यांच्या मार्गदर्शनात पीएचडी केली. हाडाचे मॉडेल्स तयार करण्यात ते पारंगत झाले. शरीरातील एखादे हाड किंवा ट्यूमर काढल्यानंतर त्याच ठिकाणी तेवढेच हाड किंवा मास घट्ट बसविण्यासाठी थ्रीडीचा वापर करीत सर्जिकल गाइड उपकरण तयार केले. या उपकरणाची सध्या ट्रायल सुरू असून काही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे संदीप डहाके यांनी सांगितले. यासाठी वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेज तसेच मेडिकलमधील दंत विभागाच्या डॉक्टरांची मदत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शस्त्रक्रिया झाली सुलभ

नेहमीच्या प्रक्रियेत शस्त्रक्रिया करताना डॉक्टर तोंडातील ट्यूमरचे मोजमाप करून तेवढ्याच आकाराचे अवयव तयार करून ते बसविल्या जाते.या प्रक्रियेला वेळ लागतो. शिवाय तयार केलेले अवयव योग्य पद्धतीने घट्ट बसेल याचीही शाश्वती नसते. परंतु सर्जिकल गाइड उपकरणाच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या ट्यूमरएवढ्या आकाराचे अवयव तयार करून संगणकीय प्रणालीने घट्ट बसविले जाते. यात डॉक्टरांचा शस्त्रक्रियेवरील वेळही वाचतो अन् शस्त्रक्रियाही सुलभ होत असते.

दुसऱ्यांदा शस्त्रक्रियेचीही गरज नाही

सध्याच्या प्रचलित शस्त्रक्रियेमुळे एखादेवेळी तयार केलेले हाड, अवयव घट्ट न बसल्यास काही दिवसांनी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागते. यात रुग्णाला आर्थिक फटका बसतोच, शिवाय त्याला वेदनाही सहन कराव्या लागतात. परंतु सर्जिकल गाइड उपकरणाद्वारे काढण्यात येणाऱ्या ट्यूमरच्या आकाराचेच अवयव किंवा हाड तयार करून अगदी घट्ट बसविले जाते. त्यामुळे दुसऱ्यांदा शस्त्रक्रियेची गरज पडत नाही.

सद्यःस्थितीत नोकरीची संधी नसल्याने स्टार्ट अप सुरू करण्याचा निर्धार केला. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया` योजनेतून बायोटेक्नॉलॉजी स्कीलच्या माध्यमातून बायरॅककडून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळवले. केंद्र सरकारच्या अटीनुसार पर्सिसर्ज ही कंपनी स्थापन केली. या कंपनीतून सध्या पाच ते सहा जणांना रोजगारही मिळत आहे. सर्जिकल गाइड या उपकरणाबाबत क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.
- संदीप डहाके, संचालक, पर्सिसर्ज प्रायव्हेट लिमिटेड.

(Student from Nagpur made Surgical guide device for cancer patients)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे पाटील राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT