carelessness is increasing for corona Social Distance to take precautions
carelessness is increasing for corona Social Distance to take precautions 
health-fitness-wellness

मास्कशिवाय सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही, संशोधनात महत्वाचे खुलासे

सकाळ डिजिटल टीम

कोरोना सुरू झाल्यापासून अगदी गावोगावी नव्या इंग्रजी शब्दांचा प्रसार झाला. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं महत्वही पटवून देण्यात आलं. ठिकठिकाणी हे शारीरिक आंतर पाळण्यासाठी गाईडलाईन्स दिसतात. अनेक ठिकाणी यासाठी बोर्ड लावलेले असतात. मात्र सोशल डिस्टन्सिंगवर आता संशोधन झालं आहे. क्यूबेक, इलिनॉय आणि टेक्सासमधील संशोधकांच्या मते, कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी, दोन मीटर अंतर मास्कशिवाय पुरेसं नसल्याचा निष्कर्ष यामध्ये काढण्यात आलाय. याचाच अर्थ तुम्ही मास्क घालत नसाल, तर हे अंतर ठेऊन काहीच फायदा होणार नाही, असं संशोधकांनी मत मांडलं आहे. अभ्यासाचे निष्कर्ष 'बिल्डिंग अँड एन्व्हायर्नमेंट' जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. घरातील मास्क हवेतील कणांच्या दूषिततेची श्रेणी सुमारे 67 टक्क्यांनी कमी करू शकतो. असंही यामध्ये नमूद करण्यात आलंय.

जेव्हा लोक कोणतेही मास्क न घालता फिरतात, तेव्हा 70 टक्क्यांहून अधिक हवेतील कण 30 सेकंदात दोन मीटरची लांबी पार करतात. याउलट, मास्क घातलेला असल्यास 1 टक्क्यांपेक्षा कमी कण दोन मीटरपेक्षा लांब जाऊ शकतात. द्रव आणि वायूंच्या प्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वापरलेल्या मॉडेल्सवर आधारित, मॅकगिल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी डी शेरब्रुक, टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी आणि नॉर्दर्न इलिनॉय युनिव्हर्सिटीच्या टीमने एक प्रयोग केला. इनडोअर स्पेसमध्ये खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या कणांचा वेग पडताळण्यासाठी एक संगणक प्रोग्रॅम विकसित केला. यामार्फत मास्क घातलेल्या व्यक्तींनी खोकल्यानंतर त्यांच्यामार्फत होणाऱया जैव-दूषित पदार्थांच्या प्रसाराचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये लक्षणीय परिणाम झाल्याचे संशोधकांना जाणवले. यामध्ये खोकताना बॉडी पोश्चरचाही अभ्यास करण्यात आला.

कोरोनाची लक्षणं असलेल्या व्यक्तींकडून हवेत पसरणाऱ्या विषाणूंच्या प्रसाराचे मुख्य स्रोत म्हणजे खोकला आहे. हा अभ्यास संसर्गजन्य रोगांचे विषाणू आसपास कशा पद्धतीने पसरू शकतात, याची माहिती देतो. तसेच विविध सरकारांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांविषयी निर्णय घेण्यास मदत करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT