coffee esakal
health-fitness-wellness

सकाळी कॉफी प्या, डोळे चांगले ठेवा

सायकॉफार्मलॉजी जर्नलमध्ये अलिकडेच याविषयी अभ्यास करण्यात आला

भक्ती सोमण-गोखले

सकाळची (Morning) गरमागरम कॉफी (Coffee) प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवस (Day) सुरू होत नाही. ती प्यायल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. कॅफीनची कीक तुम्हाला सकाळी उठविण्यासाठी भाग पाडते. सायकॉफार्मलॉजी जर्नलमध्ये अलिकडेच प्रकाशित झालेल्या अभ्यासात (study)कॅफेनचा वापर तुमच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण लक्ष गाठण्यास मदत तर होतेच पण तुमची सतर्कता आणि अचूकता वाढविण्यासाठी मदत होते. तुमची प्रतिक्रिया देण्याची वेळ कॅफीनमुळे सुधारू शकते, असेही त्यात महटले आहे.

coffee

या अभ्यासासाठी वॉटरलू स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री अँड व्हिजन सायन्स आणि ग्रॅनडा विद्यापीठातील संशोधकांनी सहकार्य केले. कॅफीन डोळ्यांच्या जलद हालचालींचा वेग वाढवते, हे आधीच माहिती आहे. संशोधकांना कॅफीनमुळे गतिमान दृष्टतीक्ष्णतेवर आणखी काय परिणाम होतो, याचा अभ्यास करायचा होता. म्हणजे, डोळे हलवताना लहान तपशील शोधण्याची आणि ओळखण्याची क्षमता कशी आहे. हलणारे चित्र पाहण्याची क्षमता कौशल्ये अनेकांमध्ये महत्त्वाची असतात. त्यात चौक ओलांडणे किंवा किराणा दुकानाच्या गल्लीतून चालत असताना शेल्फवर काहीतरी शोधणे असे प्रकार असल्याचे संशोधकांनी सांगितले.

coffee

कॅफीनच्या सेवनाचे परिणाम

अभ्यासात सहभागी झालेल्या एका गटाने कॅफीन कॅप्सूल (4mg/kg) घेतले. तर दुसर्या गटाने प्लेसबो कॅप्सूलचे सेवन केले. कॉम्प्युटरवर चाचणी करून त्यांची हलणारे चित्र पाहण्याची क्षमता कौशल्ये अंतर्ग्रहण करण्यापूर्वी आणि 60 मिनिटांनंतर मोजली गेली. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी कॅफीन कॅप्सुल घेतले होते त्यांची हलणारी चित्रे पाहण्याची क्षमता अचूक आणि वेगवान होती. कॅफीनचे सेवन एखाद्या व्यक्तीच्या व्हिज्युअल फंक्शनसाठी सतर्कता आणि जागृतपणाची भावना वाढवून मदत करू शकते,” असे आमचे निष्कर्ष सांगत असल्याचे वॉटरलूच्या स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री अँड व्हिजन सायन्सच्या डॉ. क्रिस्टीन डाल्टन यांनी सायन्सडेलीने सांगितले.

coffee

खूप जास्त कॅफिन घातकच

चहा किंवा कॉफी कमी ते मध्यम प्रमाणात सेवन केलेली चांगली असते. पण, जास्त प्यायल्यास ते आरोग्यासाठी घातकच असते, कॅफीन तुम्हाला जागरूक राहण्यास मदत करते. पण जास्त कॉफी प्यायल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. अभ्यासानुसार कॅफीनचे जास्त सेवन केल्याने झोप येण्यासाठी लागणारा वेळ वाढू शकतो. तसेच झोपेची एकूण वेळ कमी होऊ शकते. तुम्हाला उठण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सकाळी कॉफी पिणे बरे वाटते. पण, जास्त प्रमाणात कॅफीन प्यायल्याने स्टूल, जुलाब आणि काही लोकांमध्ये गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

coffee

किती प्रमाणात कॅफीन घ्यावे?

मेयो मेयो क्लिनिकच्या मते, दिवसाला 400 मिलीग्राम (मिग्रॅ) कॅफीन ( यापासून साधारण चार कप कॉफी बनते) बहुतेक निरोगी लोकांसाठी सुरक्षित आहे. पण कॅफिन मुलांसाठी चांगले नाही. गर्भवती स्त्रिया किंवा जे मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ज्या स्तनपान करत आहेत त्यांना दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कॅफिनचे सेवन करण्याची मर्यादा आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT