kandpal, actress 
health-fitness-wellness

योगासने हाच सर्वांगीण व्यायाम!; फिटनेसची पंचसूत्री

सुकीर्ती कांडपाल, अभिनेत्री

माझा दिनक्रम अभिनय क्षेत्रात असल्यामुळे  खूप व्यग्र असतो. त्यामुळे मी चार-पाच दिवस योगासने करण्याचा आणि दररोज दीर्घ श्वसन करण्यासाठी १० ते १५ मिनिटे काढण्याचा प्रयत्न करते. याशिवाय तीन दिवस वेट ट्रेनिंगही करते. आठवड्यातून एखादा दिवस कोणताच व्यायाम करत नाही व शरीराला आराम देत पुन्हा ताजीतवानी होते. वारंवार प्रवासामुळेही शीण येत असल्याने मी व्यायामाइतकचे महत्त्व झोप आणि आरामाला देते. योगासने हा सर्वांगीण व्यायामाचा एकमेव प्रकार आहे. त्यामुळे शारीरिकच व मानसिकदृष्ट्याही मदत होते, लवचिकता वाढते, शरीर कणखर होते आणि सर्वांगीण फिटनेस मिळतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्यास शांत राहता, विचार करू शकता. 

माझे डाएट अगदी साधे असते. मी घरी बनविलेलेच जेवण घेते. बाहेर असताना माझ्या शरीरासाठी योग्य आहार निवडते. दिवसाची सुरुवात मी भरपेट जेवणाने करते. दिवसभर आहार कमी करत रात्री अगदीच कमी जेवते. माझ्या जेवणात फळांचा किंवा ॲव्हाकॅडोचा उपयोग करते. रिफाइंड शुगर किंवा पीठ वापरत नाही. त्याचप्रमाणे फळे आणि जास्त न शिजलेल्या भाज्यांचाही आहारात समावेश असतो. सकाळी अंडी, दिवसभरात मासे, चिकन, मांस किंवा उच्च प्रोटिन असलेल्या भाज्या, डाळी, पनीर यांचा समावेश असतो. रात्री मी सूप घेते. उकडलेल्या दोन अंड्यांसोबत व्हेज क्‍लिअर सूप आणि स्टर फ्राइड भाज्या असे साधे जेवण मी घेते. मी रात्री आठच्या आत जेवण उरकते. 

मी नेहमीच फिट राहण्याचा प्रयत्न करते; मग ते कोणत्याही पद्धतीने असो. माझी ताकद, क्षमता, लवचिकता वाढेल असे व्यायाम करते. योगासने करायला मला आवडते; पण पायांसाठी मी वेट्‌स करणे पसंत करते. वयानुसार तुम्हाला तुमचे स्नायू बळकट करावे लागत असल्याने मी आठवड्यातून दोनदा वेट्‌स करते. सध्या मी ‘सोनी टीव्ही’वर ‘स्टोरी 9 मंथ्स की’ या नवीन मालिकेत एका महत्त्वाकांक्षी, यशस्वी उद्योजिका आलिया श्रॉफची भूमिका साकारत आहे. ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आणि अनोख्या स्वरूपाची आहे. त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. माझ्या फिटनेस आणि वेलनेसचा या व्यक्तिरेखेसाठी खूप फायदा झाला. 

फिटनेसची पंचसूत्री 
झोपण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर खाणे बंद करा. 
आहारात रिफाइंड शुगर आणि रिफाइंड पिठे वापरू नका. 
न्याहारी व्यवस्थित, पोटभर करा. 
योगसनांचा तुम्हाला शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही उपयोग होतो. 
जेवणात हाय फायबर आणि हाय प्रोटिनचा समावेश करा. 

(शब्दांकन - अरुण सुर्वे) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT