covid 19 test
covid 19 test 
health-fitness-wellness

सावधान! कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून बिनधास्त नका होऊ; काळजी घ्या

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण आता हळू हळू कमी होत असताना दिसत आहे. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो की निगेटिव्ह याची चिंता लोकांना असते. रिपोर्ट निगेटिव्ह आला की लोक सुटकेचा निश्वास टाकतात. तसंच पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुन्हा निगेटिव्ह रिपोर्ट येतो तेव्हा पुढचे काही दिवस क्वारंटाइन राहतात. त्यानंतर संबंधितांना बाहेर फिरता येतं. मात्र टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे तुम्हाला पुन्हा कोरोना होणारच नाही असं नाही. पुन्हा कोरोना होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. 

एखाद्याला कोरोना होऊन गेला असेल तर त्याला संसर्गाची शक्यता कमी असली तरी त्याच्यापासून इतरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची टेस्ट केली तरी सर्वच रिपोर्ट अचूक येतील असं नाही. कोणत्या परिस्थितीत टेस्ट केली आहे यावर अवलंबून आहे. RT-PCR टेस्टबाबत असं म्हटलं जातं की यामध्ये थोडा जरी संसर्ग असेल तरी तो समजतो. ही टेस्ट महागडी असून याचे रिपोर्ट येण्यास 24 ते 42 तास लागतात. तर अँटिजेन टेस्टचे रिपोर्ट लवकर येतात मात्र ते अचूक असतीलच याची खात्री देता येत नाही. 

कोरोनाची टेस्ट कधी केली यावरही सर्व काही अवलंबून आहे. सध्या कोरोनाची लक्षणे दिसण्यास 5 ते 12 दिवस लागतात. त्यामुळे किमान दोन आठवडे स्वत:ला आयसोलेट करायला हवं. संसर्गाच्या सुरुवातीला 4 ते 5 दिवसांमध्ये RT-PCR टेस्ट केल्यास त्याचेही रिपोर्ट चुकीचे येण्याची शक्यता असते. यातच अँटिजेन टेस्ट केली तर त्यात ही शक्यता अधिक असते. 

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे झालेल्यांनी काळजी घ्यायला हवी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर केला पाहिजे. तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. कोरोना झाल्याने त्याचा प्रकृतीवर परिणाम झालेला असतो. अशा वेळी शरीराला आराम देण्याची गरज आहे. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके चांगले.

कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे तुमच्या शरीरात कोरोना विरोधात प्रतिकार शक्ती आहेच असं ठामपणे सांगता येत नाही. फक्त तुमच्या शरीरात कोरोनाचा शिरकाव झालेला नसतो. अशा परिस्थितीत कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

कोरोना झालेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला 14 दिवस क्वारंटाइन करण्याची गरज आहे. तसंच टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगेच लोकांमध्ये मिसळणं टाळावं. मास्क, हँड सॅनिटायझर यांचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. तसंच जराशी लक्षणे दिसली तरी आयसोलेट होऊन योग्य ती काळजी घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT