these are the reasons behind big fatty stomach read full story  
health-fitness-wellness

काय पोटाचा घेर वाढतोय? मग हे नक्‍कीच वाचा... 

अथर्व महांकाळ

नागपूर : 'खाते पिते घरका' असं एक बिरुद लठ्ठ माणसापुढे नेहमी लावले जाते. ज्या व्यक्तीचं जितकं पोट बाहेर तेवढा तो सुखी आणि समाधानी असेही म्हटले जाते. तर किरकोळ शरीरयष्टी असलेल्यांना हिणवलेही जाते. ज्या व्यक्तींचे पोट निघालेले असते, त्यांच्यावर बायकोचे जास्त प्रेम आहे की काय, असा टोलाही अनेक जण लगावतात. मात्र, पोट बाहेर असणं हे सुखी असण्याचे लक्षण नक्‍कीच नाही. तर ही एक गंभीर समस्या आहे. पोट निघणे म्हणजे एकप्रकारे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. आजकाल अनेक जण पोट बाहेर आल्यामुळे त्रस्त आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का नेमक्या कोणत्या कारणांमुळे तुमचं पोट बाहेर येतं? 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे अनेक जणांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळसुद्धा नाही. मात्र, त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जणांना लहान वयातच काही आजार जडले आहेत. पोट बाहेर येणे हीसुद्धा एक गंभीर समस्या आहे. 

पोट बाहेर आल्याने अनेक प्रकारचे योग्य जडण्याची दाट शक्‍यत असते. पोटाचे विकार, हृदयविकार, किडनीसंबंधीच्या समस्या, आतड्यांबाबत समस्या असे अनेक रोग पोट बाहेर निघालेल्या व्यक्तींना जडतात. पोट बाहेर आलेल्या काही व्यक्तींच्या पायावर सूजही असते. तसेच अशा लोकांना अनेकांच्या टीकेचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये तणावाचे प्रमाणही वाढते. 

ही आहेत पोट बाहेर येण्याची कारणे - 

जंक फूडचे वाढते प्रमाण 

आजकाल तरुण पिढीमध्ये जंक फूड म्हणजेच बाहेर रस्त्यावरील पदार्थ खाण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र, हे जंक फूड आपल्या शरीरासाठी आणि पोटासाठी सर्वात घातक आहेत. रस्त्यावरील पदार्थांमध्ये मिठाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचा परिणाम पचनशक्तीवर होतो आणि आपलं पोट बाहेर येण्यास सुरुवात होते. गॅसेस आणि ऍसिडिटीमुळे सुद्धा पोट बाहेर येण्याची शक्‍यता असते. 

शरीरात पाण्याची कमतरता 

अनेक जण दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे शरीराला आवश्‍यक असलेलं पाणी पिऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पोटविकार आणि पोटदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने अशा व्यक्तींना अपचनाचा त्रास होतो आणि यामुळे त्यांचे पोट बाहेर येते. तसेच महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे पोट बाहेर येण्याची समस्या उद्भवू शकते. 

जेवणानंतरचा आराम 

बहुतांश जणांना जेवण केल्यानंतर झोपण्याची किंवा बसून राहण्याची सवय असते. ज्यामुळे त्यांचं अन्नपचन होऊ शकत नाही. म्हणून अशा व्यक्तींचे पोट बाहेर येते. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडावेळ फिरणं महत्त्वाचे आहे. या फिरण्यामुळे शरीरात ऑक्‍सिजनची पातळी वाढते. ही ऊर्जा पातळी वाढल्याने झोप येत नाही. 

कामाचा प्रचंड ताण

पोट वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यावर असलेला कामाचा प्रचंड ताण. आपला मेंदू आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाशी जोडला गेला असतो त्यामुळे मेंदूवर कुठलाही ताण आला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर जाणवतो. अनेकदा प्रचंड तणावात असल्याने अनेकांना पोटाचे विकार होतात. तसेच डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार यामुळे अनेकांचे पोट बाहेर येण्याचीही शक्‍यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT