नागपूर : आजपर्यंत आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल किती असेल? याबद्दल आपण कुणीही तितकासा गंभीरपणे विचार केला नसेल. मात्र कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हल प्रत्येकानं मोजणं सुरु केलं आहे. इतकंच नाही तर महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेव्हल तपासात आहेत. मात्र ही ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे की जास्त हे ओळखायचं कसं? शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याबद्दल काही लक्षणं आपल्याला पूर्वसूचना देतात. कोणती आहेत ती लक्षणं जाणून घेऊया.
फक्त कोविड १९ हा एकच रोग असा नाही ज्यात शरिरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होते. आणखी एका रोगात ही लक्षणं आढळतात. या लक्षणांनी समजतं की शरिरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे हे समजते. कोणता आहे हा रोग?
सविस्तर वाचा - खर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण
जेंव्हा शरिरातील पेशींना, उतींना आणि शरिरांतर्गत अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेंव्हा हा हायपोक्सिया आजार उद्भवू शकतो. शरिरातील रक्तामध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन ती शरिरातील इतर अवयवांना कशी घातक ठरु शकते. खूपदा लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा रक्ताभिसरण नीट होत नसते. पल्स ऑक्सिमीटर या उपकरणाच्या मदतीने ही क्रिया नीट चालते का समजून घेता येते.
या आजारात श्वास लागतो. श्वास कोंडल्यासारखा होणे हेच हायपोक्सियाचं मुख्य लक्षण मानलं जातं. तो हळूहळू वाढू शकतो.
जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तर रक्तातील आॅक्सिजन लेव्हल कमी होते. आपल्या शरिरातील अवयवांना, पेशींना उतींना प्राणवायू आवश्यक असतो. तो मिळाला नाही तर समस्या निर्माण होऊ शकते. शरिरातील ऑक्सिजन लेव्हल ही ९५% हून अधिक असणं हे उत्तम आरोग्यदायी असण्याचं लक्षण मानलं जातं. पण ९० पेक्षा कमी असलेली ऑक्सिजन लेव्हल ही थोडीशी घातक असते. ही हळूहळू कमी होत गेली की रुग्ण गंभीर होतो आणि दगावू शकतो. ही कमी झालेली ऑक्सिजन लेव्हल डाॅक्टर बाहेरुन ऑक्सिजन देऊन वाढवू शकतात पण त्यालाही मर्यादा असतात.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.